कलाकारांसाठी रंगमंच किती महत्वाचा असतो हे तर आपण जाणतोच. रंगभूमीवरूनच प्रत्येक कलाकाराच्या करिअरची सुरूवात होत असते. ज्या रंगमंचाने आपल्याला प्रसिद्ध दिली, अभिनयासाठी बळ दिले त्या रंगमंचाला खरतर कलाकार कधीच विसरू शकत नाहीत. सध्या सुबोध भावे रंगमंचाविषयी असेच काही बोलत आहे. सुबोध म्हणतो. आयुष्यात तुम्ही कुठल्याही स्टेज ला जा, पण ज्या स्टेज मुळे तुम्ही उभे आहात त्या स्टेजचे स्मरण आणि नमन करायला विसरू नका. सोशल साईट्सवर सुबोधने दिलेल्या या संदेशाचे अनेकजण कौतुक करीत आहेत.
Aaushyat kuthalyahi STAGE la ja...pan jya STAGE mule tumhi ubhe ahat tyacha Smaran ani Naman karayala visaru naka pic.twitter.com/sMknPlPS5P— Subodh Bhave (@subodhbhave) August 24, 2016