अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच विविध स्टाइलमधले फोटो सोशलमीडियावर अपडेट करत असते. सोनालीचे स्कर्ट, जीन्स, वन पीसमधले फोटो सोशलमीडियावर आतापर्यंत आपण नेहमीचे पाहिले आहेत. सोनालीने नुकताच अपलो़ड केलेल्या एका फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत तिचा लुक एकदम हटके आहे. नेहमी लांब केसांमध्ये दिसणारी सोनाली या फोटोत शॉर्ट हेअर स्टाइलमध्ये दिसते आहे. सोनालीचा इंडो-वेस्टन स्टाइलमधला लुक तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. तिच्या या फोटोचे सोशलमीडियावर भरभरून कौतुक होते आहे.
सोनालीचा लूक चेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 16:02 IST