सोनालीसाठी शाल्मली आहे बाॅम्ब !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 15:02 IST
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपल्या दर्जेदार अभिनयाने ओळखली जाते. सोशल साईट्सवर नेहमीच अपडेटेड राहणारी ...
सोनालीसाठी शाल्मली आहे बाॅम्ब !
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपल्या दर्जेदार अभिनयाने ओळखली जाते. सोशल साईट्सवर नेहमीच अपडेटेड राहणारी सोनाली सतत काहीना काही ट्वीट करून स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. यामुळे तिच्या चाहत्यांनादेखील सोनालीच्या सर्वच गोष्टींची सहजरित्या माहिती मिळते. नूकतीच सोनाली एका गायिकेला तु बॉम्ब आहेस असे म्हणाली. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की सोनाली कोणाला आणि का बॉम्ब म्हणाली. तर जास्त विचार करू नका कारण सोनाली गायिका शाल्मली खोलगडेला बॉम्ब म्हणाली. त्याचे झाले असे की, शाल्मली सोनालीची आवडती गायिका आहे. आणि नूकत्याच या दोघी भेटल्या, मग सोनालीला देखील आपल्या या लाडक्या गायिकेसोबत एका फ्रेममध्ये बंदिस्त होण्याचा मोह आवरता आला नाही. मग काय सोनालीने झक्कास सेल्फी काढला आणि तो ट्वीटरवर अपलोड केला. एवढेच नाही तर, सोनाली म्हणतेय, शाल्मली माझी आवडती गायिका आहे आणि ती खरोखरीच एक 'टॅलेन्ट बॉम्ब' आहे. वाह याला म्हणतात एकदम हटके तारीफ.