Join us  

सोनाली कुलकर्णीने साकारली इको फ्रेंडली गणेश मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 4:49 PM

अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इको फ्रेंडली गणपतीची सुंदर मूर्ती बनवली आहे. विशेष म्हणजे तिने पहिल्यांदाच गणेश मूर्ती बनवली आहे.   

ठळक मुद्देस्वतः बाप्पाची मूर्ती बनवताना मिळतो वेगळा आनंद - सोनालीइको फ्रेंडली मूर्ती साकारण्याचे समाधान काही औरच - सोनाली

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळीकडे जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यात आता अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इको फ्रेंडली गणपतीची सुंदर मूर्ती बनवली आहे. विशेष म्हणजे तिने पहिल्यांदाच गणेश मूर्ती बनवली आहे.   

सोनालीच्या भावाचा मित्र आर्टिस्ट असून इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती घरी बनवण्याची संकल्पना त्याचीच होती. सोनाली, तिचा भाऊ व त्याच्या मित्राने मिळून तिच्या पुण्यातील राहत्या घरी ही इको फ्रेंडली मूर्ती बनवली आहे. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या या मूर्तीला कुंकूने रंगविण्यात आले आहे. ही मूर्ती खूप मोहक झाली आहे. याबाबत सोनालीने सांगितले की, ''इतकी वर्षे आपण ऐकतो आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती टाळा व इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा. आमच्या घरी दरवर्षी इको फ्रेंडली बाप्पा विराजमान होतात. ही मूर्ती शाडूच्या मातीची असते हे माहित होते पण रंग कोणते वापरले जातात हे माहित नव्हते. पण, पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने इको फ्रेंडली मूर्ती साकारण्याचे समाधान काहीच औरच असते.'' 

 गणपती बाप्पा सर्वांचा लाडका दैवत आहे. माझा बाप्पा असे आपण म्हणतो पण जेव्हा स्वतःच्या हाताने मूर्ती घडवतो तेव्हा खऱ्या अर्थाने बाप्पा आपला असतो. कारण आपण तो घडवलेला व आकार दिलेला असतो. जीव ओतून ही मेहनत घेतलेली असते.  त्यामुळे स्वतः बाप्पाची मूर्ती बनवताना एक वेगळा आनंद व समाधान मिळते. यापू्र्वी कधी मी मूर्ती बनवलेली नव्हती. पण पहिल्यांदा बाप्पाची मूर्ती बनवताना खूप मजा आली. हा खूप निरागस अनुभव असल्याचे सोनाली म्हणाली. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीगणेशोत्सव