Join us  

सोनाली कुलकर्णीचा ‘ती अँड ती’मधील ग्लॅमरस लूक पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 3:26 PM

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अँड ती’ या सिनेमातील सोनालीची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी तिला खात्री आहे. या चित्रपटातील तिचा लूक देखील खूपच छान आहे.

ठळक मुद्देया चित्रपटातील तिचा लूक ग्लॅमरस असल्याने ती खूपच आकर्षक आणि हॉट दिसतेय आणि तिने तिचा हा लूक अगदी उत्तमरित्या कॅरी केला आहे. सोनाली कॉन्फिडंट आहेच पण या भूमिकेमुळे तिच्यातला कॉन्फिडंस हा अजून जास्त दिसून येतोय.

मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या बळावर, कौशल्यावर या इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मग ते अभिनय कौशल्य असो किंवा नृत्य कौशल्य... प्रत्येकांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे आणि त्यापैकी अशीच एक मेहनती, सुंदर आणि हुशार अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. 

सोनालीने आजवर अनेक वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोनालीने अनेक हिट चित्रपट दिले असून तिला ‘अप्सरा’ या नावानेच ओळखले जाते. अप्सरा म्हटल की, साहजिकच सोनालीच आठवते... सोनालीचा ‘ती अँड ती’ हा आगामी मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात ती एका वेगळ्या आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे.

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अँड ती’ या सिनेमातील सोनालीची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी तिला खात्री आहे. या चित्रपटातील तिचा लूक देखील खूपच छान आहे. या चित्रपटातील तिचा लूक ग्लॅमरस असल्याने ती खूपच आकर्षक आणि हॉट दिसतेय आणि तिने तिचा हा लूक अगदी उत्तमरित्या कॅरी केला आहे. सोनाली कॉन्फिडंट आहेच पण या भूमिकेमुळे तिच्यातला कॉन्फिडंस हा अजून जास्त दिसून येतोय. विशेष म्हणजे, सोनाली कुलकर्णीने या अगोदर मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा माधव’मध्ये  काम केलं होतं. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने दोघी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. या सिनेमाचा हिरो आणि सिनेमाच्या जॉनरची देखील चांगलीच चर्चा आहे. अर्बन रोमँटिक कॉमेडी जॉनर असलेल्या या सिनेमात सोनाली पुष्कर जोगसोबत स्क्रिन शेअर करत आहे.

या सिनेमात सोनाली कुलकर्णीसोबत प्रार्थना बेहरे देखील प्रमुख भूमिका साकारत आहे. आनंद पंडित यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. वैषल शाह, पुष्कर जोग आणि मोहन नदार यांची निर्मिती असलेला ‘ती अँड ती’ ८ मार्च २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी