Join us  

अप्सरा ! मालदीवमध्ये सोनाली कुलकर्णीचा बोल्ड बिकिनी लुक, फोटो व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 11:32 AM

Sonalee Kulkarni at Maldives : सोनालीनं मालदिव व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ठळक मुद्देसोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममताची भूमिका केली.  

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी  (Sonalee Kulkarni ) सध्या पती कुणाल बेनोडेकरसोबत मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय. मालदीवच्या अथांग निळ्याशार समुद्राच्या साक्षीनं हे कपल धम्माल मज्जा करतेय आणि या व्हॅकेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सोनालीनं मालदिव व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काल सी प्लेनसमोरचे अनेक फोटो सोनालीनं शेअर केले होते. आता  सोनालीनं बिकिनीतला एक फोटो शेअर केला असून त्यात तिचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे. इन्स्टास्टोरीवरही तिनं काही फोटो शेअर केले आहेत.  या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेन्ट्चा वर्षाव केला आहे. (Sonalee Kulkarni bikini photo at Maldives enjoys vacation with husband)

चाहत्यांसोबतच सुबोध भावे, अमेय वाघ, प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत, गौहर खान, हेमंत ढोमे, पर्ण पेठे या सेलिब्रिटींनीही सोनालीच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच सोनालीने कुणालसोबत लग्नगाठ बांधली होती. दुबईत अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.  

लग्नानंतर सोनाली व कुणाल पूर्व आफ्रिकेत हनीमूनसाठी गेले होते. इथले काही फोटोही तिने शेअर केले होते. यानंतर लग्नाला १ महिना पूर्ण झाल्याच्या आनंदात हे कपल दुबईतील एका अलिशान हॉटेलात पोहोचले होते. सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ या चित्रपटातून. या चित्रपटात तिने केलेले लावणीनृत्य प्रचंड गाजले. त्यातील ‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले.यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा(चित्रपट) आणि झपाटलेला 2 यांसारखे अनेक चित्रपट केले. सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममताची भूमिका केली.  

टॅग्स :सोनाली कुलकर्णी