Join us  

लंडनमध्ये पार पडलं सोनाली कुलकर्णीचं 'White Wedding', पाहा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 3:57 PM

Sonalee Kulkarni Wedding : होय, सोनालीने गतवर्षी 7 मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईतील एका मंदिरात लग्नगाठ बांधली होती. गेल्या शनिवारी म्हणजे 7 मेला लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनालीनं पुन्हा एकदा विधीवत लग्न केलं.

Sonalee Kulkarni Wedding in London: मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni ) अनेकदा तिच्या आगामी प्रोजेक्टशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. सध्या चर्चा आहे ती तिच्या लग्नाची. होय, सोनालीने गतवर्षी 7 मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत ( Kunal Benodekar) दुबईतील एका मंदिरात लग्नगाठ बांधली होती. गेल्या शनिवारी म्हणजे 7 मेला लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनालीनं पुन्हा एकदा विधीवत लग्न केलं.

लंडनमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याच्या फोटोंची प्रतीक्षा चाहत्यांना आहेच. तूर्तास या लग्नसोहळ्यादरम्यानचा पहिला फोटो समोर आला आहे. यात सोनाली व्हाईट गाऊनमध्ये दिसतेय तर तिचा पती कुणाल ब्लॅक कलरच्या सुटाबूटात दिसतोय. 

7 मे 2022 रोजी सोनाली आणि कुणालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. हेच औचित्य साधून त्यांनी याच दिवशी विधिवत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडे ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीनं यामागचं कारणही स्पष्ट केलं होतं.

‘ 7 मे 2021 रोजी कोरोना महामारीमुळे दोनवेळा कॅन्सल झालेलं आमचं लग्न आम्ही रजिस्टर केलं दुबईमध्ये. मी आणि माझा नवरा केवळ आम्ही दोघंच होतो आणि आमच्या कुटुंबानं झूम कॉलवरती तो क्षण अनुभवला. पण अर्थात आम्हाला विधी करायच्या होत्या. मी तेव्हाही सांगितलं होतं की, जेव्हा परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा आम्ही विधी करू. विधीनिशी लग्न माझं पहिल्यांदाच होतंय आणि शेवटचं होणार आहे. विधी करण्यामागे आमच्या भावना जुळलेल्या आहेत,’ असं सोनाली म्हणाली होती.सोनालीचा नवरा कुणाल दुबईत वास्तव्याला असतो. त्याचे कुटुंबीय लंडनला वास्तव्यास असतात. कुणालचं शिक्षण लंडनमधल्या  मर्चंट्स टेलर स्कूलमध्ये झालं आहे. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं आहे.  

टॅग्स :सोनाली कुलकर्णी