Join us

गणेशोत्सवानिमित्त मराठी कलाकारांनी दिले सामाजिक संदेश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 18:49 IST

भाद्रपदाची चाहूल लागताच महाराष्ट्रात नाही तर सगळीकडेच अमाप उत्साहात येणारा, घरोघरी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी. चहूकडे ...

भाद्रपदाची चाहूल लागताच महाराष्ट्रात नाही तर सगळीकडेच अमाप उत्साहात येणारा, घरोघरी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी. चहूकडे गणरायाच्या मूर्ती, कंठी, सजावटीची साधने, मखर, ढोल-ताशा घेऊन गणरायाच्या स्वागतासाठी तयारी करणारी पथकं ... सर्वत्र उत्साहाचे, मंगलमय वातावरण असते... गणपती बाप्पा येणार या कल्पनेनेच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह असतो. गणपती म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्याच्या येण्याने सगळ्यांची विघ्न, दु:ख, समस्या दूर होतात. या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सगळेच एक महिन्या आधीपासूनच तयारी सुरु करतात. यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी काही मराठी वाहिनीच्या संपूर्ण परिवाराने जय्यत तयारी केली आहे. वाहिनीवरील कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भक्तांना मोलाचे संदेश दिले आणि धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत केले तसेच पुढच्या वाटचालीसाठी आशीर्वाद देखील घेतले. ‘सरस्वती’ मालिकेतील प्रत्येक जोडीने भक्तांना मोलाचा संदेश दिला जसे सरस्वती म्हणजेच तितिक्षा तावडेने सांगितले, ‘यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणाचा समतोल राखून साजरा करा. श्रींच्या मूर्तीच आगमन पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ढोल ताशांच्या साथीने करुया तर विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करुया, जेणेकरून जलप्रदूषण होणार नाही. तिने आपले बाप्पाबद्दल असलेले नाते देखील प्रेक्षकांना सांगितले, ‘बाप्पा देव असला तरी मला माझ्या मित्राइतकाच जवळचा आहे. माझ्यासाठी सत्कर्माचा, मन:शांतिचा उर्जेचा आणि प्रेमाचा स्थान म्हणजे बाप्पा. राघव म्हणजेच आस्ताद काळे म्हणाला ‘यंदाचा सण आपण प्रदूषणमुक्त साजरा करुया. म्हणजे बेभान होऊन नाचायचं असेल तर मोठ मोठ्या स्पीकर्सच्या भिंती उभारून, कर्णकर्कश्य गाणी लावून नाचण्यापेक्षा ढोल ताश्याच्या तालावर नाचा. शक्यतो शाडूच्या मुर्त्या वापरा. देविका (जुई गडकरी) म्हणाली, ‘माझ्यासाठी गणपती म्हणजे आयुष्याची सकारत्मक सुरुवात. आपल्या सणाचे विद्रुपीकरण होऊ देऊ नका..’नुकतीच सुरु झालेली ‘घाडगे अँण्ड सून’ मधील माई घाडगे म्हणजेच आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या सुकन्या कुलकर्णी मोने म्हणाल्या, ‘माझ्यासाठी गणपती बाप्पा म्हणजे सकारात्मक उर्जा, अद्भुत शक्ती, ६४ कलांचा अधिपती, विघ्नहर्ता, सदैव सावली देणारा आजोबा! यंदा संकल्प करा की, कुठेही दर्शनाला जाताना मिठाई नेण्यापेक्षा फळं, गुळ, साखर, नारळ, उदबत्ती, कापूर किंवा अगदी दोन हस्त एक मस्तक एवढेच बाप्पाला अर्पण करेन. ज्यांच्याकडे बाप्पाचे आगमन होते त्यांनी एखादी पेटी ठेऊन त्यात जमलेले पैसे एखाद्या गरजू संस्थेला दान म्हणून द्याल. सार्वजनिक संस्थांनी फटाके, मोठ्या मुर्त्या, सजावटीवर अनाठायी खर्च करणे टाळावे.’प्रेक्षकांचा लाडका अक्षय म्हणजेच चिन्मय उदगीरकर म्हणाला, ‘बाप्पा माझ्यासाठी सगळ्यात जवळचा देव आहे. त्याच्याबरोबर लगेच कनेक्ट होता येतं, हट्ट करता येतो आणि या सगळ्यात म्हत्वाच म्हणजे तो ते पूर्ण देखील करतो. विश्वास नसेल तर यावर्षी करून बघा. सध्या पाणी प्रश्नावर सगळेच खूप काम करत आहेत. पणी बचाओ, पाणी अडवा, त्यासाठी सगळेच कार्यरत आहेत. मला अस वाटत नदी, झरे, हे जे निसर्गनिर्मित पाण्याचे स्त्रोत आहेत त्यांचे आपण संरक्षण करुया. कसं पाणी वाढेल, त्यासाठी कोणती झाडे लावण्याची आवश्यकता आहे या प्रश्नांवर आजच्या नवीन पिढीने काम करावे असा संदेश मी त्यांना देईन. गणपती बाप्पा घरी येणार, आपल्या सोसायटीमध्ये येणार या कल्पनेनेच मन प्रसन्न होते.’तू माझा सांगाती मधील चिन्मय मांडलेकर म्हणाला, ‘गणपती बाप्पा म्हणजे मित्र जो सतत बरोबर असतो, वर्षातून एकदाच घरी येतो पण, आला की, संपूर्ण घरामध्ये उत्साहाचे वातावरण घेऊन येतो, तो कधीच जाऊ नये असे वाटतं. आवलीची भूमिका साकारणारी ऋजुता देशमुख म्हणाली, ‘गणेशोत्सव माझ्यासाठी सात्विक, धार्मिक वातावरणात कुटुंब एकत्र येण्याची वेळ.’ ‘कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस’ या कॉमेडी शोमधील प्रथम प्रेक्षक अवधूत गुप्ते म्हणतो,‘ गणपती बाप्पा मोरया!! गणपती म्हणजे काय... माझ्यासाठी बाप्पा म्हणजे एक सखा, एक बंधू... असं एक जवळच व्यक्तिमत्व वाटत मला. म्हणूनच माझचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच, जगाचं एक गोड रूप आहे. संकंटात असतो आणि देवाचा धावा करतो तेंव्हा आपल्याला गणेशाचीच मूर्ती डोळ्यासमोर येते. त्याचप्रमाणे आनंदाची गोष्ट असते तेंव्हा देखील आपण गणपतीच स्मरण करतो. मी या काळात कुठल्याही प्रकारच्या सुपाºया घेत नाही. यावर्षी मी महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी मला जाता येईल तिथे तिथे जाऊन माझ्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेणार आहे.’‘चाहूल २’ मालिकेतील सर्जेराव म्हणजेच अक्षर कोठारी म्हणाला, ‘पर्यावरण सुंदर आहे, त्यात सणाच्या उत्साहात ती सुंदरता खराब होईल असं काहीच करू नका. तुमची श्रध्दा, आस्था महत्वाची त्यासाठी लाऊडस्पीकर्सची गरज नाही. मनोभावे केलेली सेवा कशीही गणपतीपर्यंत पोहोचते.’