प्रार्थनाची सिंगीग मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 13:20 IST
आपली आवडती सुंदर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही गाणे वगैरे गाणार आहे का या विचारात तुम्ही नक्कीच पडला असाल? पण प्रार्थना ही गाणे काही गाणार नाही तर तिची ही सिंगीग मस्ती आहे लंडन येथील. या सिंगीग मस्तीबद्दल लोकमत सीएनएक्सशी बोलताना प्रार्थना म्हणाली,
प्रार्थनाची सिंगीग मस्ती
आपली आवडती सुंदर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही गाणे वगैरे गाणार आहे का या विचारात तुम्ही नक्कीच पडला असाल? पण प्रार्थना ही गाणे काही गाणार नाही तर तिची ही सिंगीग मस्ती आहे लंडन येथील. या सिंगीग मस्तीबद्दल लोकमत सीएनएक्सशी बोलताना प्रार्थना म्हणाली, नुकत्याच झालेल्या गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमावेळी आम्ही सर्व मराठी सेलेब्रिटी महेश पटवर्धन यांच्या घरी पार्टीसाठी एकत्रित जमलो होतो. त्यावेळी त्यांच्या घरी काराओके ठेवला होतो. त्यावेळी सर्वजण त्यांच्या घरी गाणे गात होते. त्याआधी मला डान्स कर अशी डिमांड केली. मी नाही म्हटल्यावर मग गाणे गाउन दाखव असे सर्व मागे लागले. म्हणून मी माझा आवाज चांगला आहे अशा अॅटीटयूड जरा जरा बहकता है... हे गाणे सिलेक्ट केले. आणि गाण्यास सुरूवात केली. पण जेव्हा माझा आवाज माईकमध्ये ऐकला त्यावेळी कळाला की,मी किती वाईट गाणे गाऊ शकते. त्यावेळी तिथे सोनाली कुलकर्णी, स्वप्नील बांदोडकर, अवधुत गुप्ते, अजित परब असे अनेक कलाकार होते. शेवटी हे सर्व कलाकार माझे गाणे ऐकून बाहेर निघुन गेले. पण तो क्षण खूप मजा, मस्ती आणि एॅन्जॉय केला. }}}}