Join us  

गायिका कविता निकमने केला नावात बदल,आता या नावाने ओळखली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 10:24 AM

खरंतर नावात खूप काही दडलेलं असतं.आचार-विचार, स्वभाव, मानसिकता असं बरंच काही स्पष्टपणे समजते. या कलेच्या दुनियेत कलाकार नाव कमावण्यासाठी ...

खरंतर नावात खूप काही दडलेलं असतं.आचार-विचार, स्वभाव, मानसिकता असं बरंच काही स्पष्टपणे समजते. या कलेच्या दुनियेत कलाकार नाव कमावण्यासाठी येतात. त्यांच्या नावानेच त्यांची वेगळी ओळख निर्माण होत असते.अनेक कलाकारांची नावं रसिकांच्या मनात घर करुन आहेत.कलाक्षेत्रात असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी आपले खरे नाव नाहीतर दुस-याच नावाने कलाक्षेत्रात नाव लौकीक मिळवणारे अशीच बरीच उदारणं आपल्या समोर आहेत. कलाक्षेत्रात करिअर घडवण्यासाठी अनेकांनी आपली नाव बदलेली आहेत.मुळात आता हा ट्रेंड मराठीतही रूढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही कलाकारांनी नावात बदल न करता अंकशास्त्राप्रमाणे नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करत असल्याचे पाहायला मिळते. तर काहींनी दुसरेच नाव लावत आपले नशीब आजमवताना दिसतात.  cnxoldfiles/a>त्या कलाकारांच्या भूमिकेच्या नावाप्रमाणेच त्यांचे खरं नाव रसिकांच्या लक्षात असते.अशाच कलाकारांपैकी  मराठमोळ्या अभिनेत्रींचा यांत आवर्जून उल्लेख करावा लागेल.सायली संजीव,रसिका सुनील आणि शर्मिला शिंदे या अभिनेत्रीने आपलं नाव शर्मिला शिंदे याऐवजी शर्मिला राजाराम असं नामकरण केलं आहे. आता यादीत आणखी एका कलाकाराचं नाव अॅड झालं आहे. हे नाव म्हणजे कविता निकम या गायिकेचे होय. या गायिकेने आपले नाव कविता राम असे केले आहे.याबद्दल तिला विचारले असता तिने सांगितले की, वडील हे प्रत्येक मुलींसाठी सुपरमॅन असतात,आयुष्यभर आपण त्यांच्या नावाने ओळखले जावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते.मला हि माझी ओळख माझ्या वडिलांपासून हवी होती,म्ह्णून मी माझ्या नावापुढे वडिलांच नाव लावून नामकरण केलं" कविता निकमने आतापर्यंत अनेक हिंदी मालिका तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन केले आहे.कविता यांनी "ये रिश्ता क्या कहलाता है", "गोदभराई", "मेरे घर आयी एक नन्हीं परी" "कैरी" " साथ निभाना साथिया"  या मालिकांसाठी तर "या टोपीखाली दडलंय काय","लाज राखते वंशाची","दुर्गा म्हणत्यात मला", "शिनमा" "थँक यू विठ्ठला", "नगरसेवक" "हक्क", "लादेन आला रे" यांसारख्या मराठी तर "गब्बर इज बॅक", "सिंग इज किंग" या हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत.