Join us  

श्रुती मराठे बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या नावाने करायची सिनेइंडस्ट्रीत काम, नाव वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 6:16 PM

श्रुती मराठेने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे हल्ली ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते. श्रुती मराठे हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच तिने तमीळ चित्रपटातही काम केले आहे. 

९ ऑक्टोबर १९८६ रोजी बडोदा येथे श्रुतीचा जन्म झाला. त्यानंतर श्रुती आणि तिचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. पुण्यातील सेंट मीरा शाळेतून तिने शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनातच तिला अभिनय आणि डान्सची आवड निर्माण झाली.

दहावी पास झाल्यानंतर श्रुतीला पहिली अभिनयाची संधी मिळाली. स्मिता तळवळकर दिग्दर्शित पेशवाई या मालिकेत तिला अभिनय करण्याची संधी मिळाली. महाविद्यालयीन जीवनात अनेक नाटकात श्रुतीने काम केले. तसेच अनेक जाहिरातीत काम केले. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरविले आणि मुंबईत दाखल झाली.  

श्रुती मराठेने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. खरेतर श्रुती मराठेने तमीळ चित्रपटसृष्टीत हेमा मालिनी या नावाने पदार्पण केले. त्यानंतर तिने नाव बदलून श्रुती प्रकाश केले. त्यानंतर दाक्षिणात्य इंडस्ट्रीत ती श्रुती प्रकाश या नावाने ओळखली जाते. तिने बऱ्याच तमीळ चित्रपटात काम केले आहे. 

२००८ साली श्रुती मराठेने 'सनई चौघडे' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राधा ही बावरी ही तिची मालिका प्रेक्षकांना जास्त भावली. तिने रमा माधव, तप्तपदी, पुणे-मुंबई-पुणे २ या चित्रपटात काम केले. २०१६ मध्ये बुधिया सिंग बॉर्न टू रन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

४ डिसेंबर, २०१६ रोजी श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत विवाह केला. 

टॅग्स :श्रुती मराठेगौरव घाटणेकर