Join us  

श्रेयस तळपदेचा फिटनेस फंडा,सोशल मीडियावरील ती पोस्ट तुम्हालाही प्रेरणा देईल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 6:00 AM

श्रेयसनं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचा हा फोटो तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल.

सेलिब्रिटी मंडळी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. सोशल मीडियावर आपल्या सिनेमांच्या प्रमोशनपासून ते स्वतःच्या जीवनातील गोष्टींची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या जीवनातील काही सुखद आणि खास क्षणसुद्धा रसिकांसह शेअर करतात. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेसुद्धा सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. श्रेयसनं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचा हा फोटो तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल.

फिटनेसबाबत सजग असलेला श्रेयस जिममध्ये घाम गाळत असल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहे. श्रेयसची पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. यांत श्रेयसचा फिटनेस गुरू त्याला फिटनेसबाबत कानमंत्र देत असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोला त्याने एक कॅप्शनही दिले आहे.

‘जेव्हा तुम्ही हार मानण्याच्या स्थितीपर्यंत पोहचता त्यावेळी तुम्ही काहीच करू शकत असं म्हणणाऱ्यांना आठवा’ असं प्रेरणादायी कॅप्शन श्रेयसने या फोटोला दिले आहे. जे हतबल झालेत आणि ज्यांना नवी ऊर्जा हवीय त्यांच्यासाठी श्रेयसची ही पोस्ट नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

टॅग्स :श्रेयस तळपदे