शशांक म्हणतो, पागलपंती जरूरी है
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 16:54 IST
प्रेक्षकांचा लाडका श्री म्हणजेच शशांक केतकर हा नेहमीच प्रेक्षकांना शांत व सोज्वळ भूमिकेत पाहायला मिळाला आहे. त्याच्या या सोज्वळ ...
शशांक म्हणतो, पागलपंती जरूरी है
प्रेक्षकांचा लाडका श्री म्हणजेच शशांक केतकर हा नेहमीच प्रेक्षकांना शांत व सोज्वळ भूमिकेत पाहायला मिळाला आहे. त्याच्या या सोज्वळ भूमिकेमागचे रहस्य त्याने नुकतेच उलगडले आहे. शशांकने नुकताच सोशलमिडीयावर एक गंमतीशीर फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये शशांक खूप फनी दिसत आहे. चष्मा काहीसा डोळयांचा वर दिसत असून, शरीरयष्टीदेखील वेगळीच दिसत आहे. नक्की हा काय प्रकार आहे. हे तर लक्षात नाही आले. पण त्याचा हा फोटो पाहून त्याचे चाहते देखील नक्कीच अवाक होतील. तसेच या फोटोखाली शशांकने स्टेटस अपडेट केले की, पागलपंती भी जरूरी है यारा. पण शशांकचा खरंच हा वेडेपणा पाहून त्याचे चाहते हसल्याशिवाय राहणार नाही.