Join us

शशांक केतकर चालविणार हॉटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 15:30 IST

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेनंतर शशांकची गाडी ...

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेनंतर शशांकची गाडी सुसाट निघाली आहे. कारण नुकताच त्याचा वन वे तिकीट हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला. आता तर शशांक थेट हॉटेल चालविणार आहे. हो आश्चर्य वाटलं ना! पण खरं आहे. शशांकने नुकतेच एक नवीन हॉटेल चालू केले आहे. शशांकने त्याच्या या नवीन व्यवसायाविषयी सोशल मीडियावर अपडेट केले आहे. त्याच्या या नवीन व्यवसायासाठी चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करीत भविष्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत.