सेल्फी है तो फोटो है अशाच काही अॅटयीटयूडने हल्ली फोटो काढले जात आहेत. जिथे जाऊ तिथे सेल्फी काढू हा जणू जगण्याचा नियमच बनला आहे. एवढेच काय, लहानांपासून त मोठयांपर्यत सर्वानाचा सेल्फीने याडं लावून ठेवलं आहे. मग या सेल्फी प्रेमात कलाकार तरी कसे मागे राहतील. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तर चक्क बॉलीवुडचे तगडे कलाकार धमेंद्र यांच्यासोबतच एक झक्कास सेल्फी काढला आहे. या सेल्फीबाबत लोकमत सीएनएक्सशी बोलताना सोनाली सांगते,आमची ही भेट एका पुरस्कारावेळी झाली आहे. या पुरस्कारावेळी त्यांचे भाषण ऐकून चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी मला अधिक प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे त्याच्याविषयी वाटणारा आदर आणखी वाढला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत खूप माणसं जोडली आहेत. आज त्यांच्या प्रेमाखातर या पुरस्कार सोहळयात रविना टंडन व अनेक मोठे व्यक्तीमहत्व उपस्थित होते. त्यामुळे साहजिकच धमेंद्र यांच्यासमोर पुरस्कार स्वीकारताना खरंच खूप आनंद झाला आहे.
सोनालीचा धमेंद्रसोबत सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 16:49 IST