Join us  

हे पाहा सोनाली कुलकर्णी आणि सुशांत शेलार यांनी कोणासोबत सेल्फी काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2017 9:59 AM

सध्या प्रत्येक व्यक्ती ही सेल्फीच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळत आहे. सेल्फी बिना जिंदगी अधूरी असे काहीसे जीवन प्रत्येकाचे झाले ...

सध्या प्रत्येक व्यक्ती ही सेल्फीच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळत आहे. सेल्फी बिना जिंदगी अधूरी असे काहीसे जीवन प्रत्येकाचे झाले आहे. त्यामुळे सेल्फी हा प्रकार सगळयांना व्यसनासारखा लागला आहे. या सेल्फी प्रेमात प्रेक्षकांचे लाडके कलाकारदेखील मागे राहिले नाहीत. आता हेच पाहा ना, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सुशांत शेलार यांनी एक झक्कास सेल्फी घेतला आहे. यांच्या या सेल्फीच्या क्लिकमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफेदेखील आहे. त्यांचा हा सेल्फी नुकताच अभिनेता सुशांत शेलार यांनी सोशलमीडियावर अपलोड केला आहे.  या सेल्फीला सोशलमीडियावर भरभरून पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. असा हा ट्रीपल धमाका प्रेक्षकांना एकाच सेल्फीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.                            बॉलिवुडचा तगडा कलाकार जॅकी श्रॉफ याचे मराठी प्रेम प्रत्येकालाच माहिती आहे. म्हणूनच या तिघांचा हा फोटो पाहता, हे तिघे एका चित्रपटात काम करत आहे का असा प्रश्न पडला असेल नक्कीच. पण हा गैरसमज दूर करा, हे तिघे एका चित्रपटात झळकत नसून त्यांचा हा सेल्फी त्यांनी एका कार्यक्रमात घेतलेला असल्याचे पाहायला मिळत आहे. एखादा बॉलिवुडचा तगडा आणि लाडका कलाकारसमोर दिसत असेल तर, त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह कोणाला आवरणार नाही. असेच काहीसे सोनाली आणि सुशांतचे झाले असणार.                      सोनाली कुलकर्णी आणि सुशांत शेलार याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्यांनी आतापर्यत एक से एक चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. तिने नटरंग, पोस्टर बॉइज, मितवा, क्लासमेट, क्षणभर विश्रांती, बघतोस काय मुजरा कर, बकुळा नामदेव घोटाळे असे अनेक सुपरहीट चित्रपटांचा समावेश आहे.