Join us

चाळीशीतही ग्लॅमरस दिसणा-या या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फिटनेसचे हे आहे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 16:21 IST

मराठी कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण ...

मराठी कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. या मराठमोळ्या सोकुल अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे. मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे.चाळीशीत असलेली सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. तिच्या या फिटनेसचे एक खास आणि विशेष कारण आहे.सोनालीला सायकलिंगची आवड आहे.ती उत्तम सायकलिस्ट आणि रनर आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. ती नेहमी खारपासून वर्सोवा किंवा बांद्रापर्यत सायकलिंग करत असते. आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे यासाठी स्वतःचे सायकलिंग आणि रनिंग करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. दररोज सकाळी साडेचार वाजता उठून ती दोन-तीन किलोमीटर रनिंग करते आणि 20-25 किमी सायकलिंग करते. रविवारी सुट्टी असली तरी ती सोनाली आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. तिच्या या कठोर मेहनतीमुळेच नुकतेच तिने गोवा स्प्रिंट ट्रायथलॉन 2018 या स्पर्धेत महिलांमधून तिसरे येण्याचा मान मिळवला आहे. ही स्पर्धा गोवा इथे पार पडली. यावेळी सोनालीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिचे मिशन पूर्ण झाल्याचेही सांगितले आहे.१६  फेब्रुवारीला सोनालीचा गुलाबजाम हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून सोनालीचा आणखी एक गुण रसिकांना पाहायला मिळणार आहे.रिअल लाइफमध्ये एक गृहिणी असलेली सोनाली पाककलेतही पारंगत आहे.आता या पाककलेचे धडे ती रुपेरी पडद्यावरुन रसिकांना गुलाबजाम सिनेमातून देणार आहे. Also Read:या गोष्टीवरुन सोनाली आणि या बड्या स्टारमध्ये निर्माण झाला जिव्हाळानसिरसाहेबांच्या अभिनयाची सोनाली प्रचंड मोठी फॅन आहे. त्यामुळं या सिनेमात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी लाभल्याने ती एक्साईटेड आहे. नसिरुद्दीन शाह यांना थिएटरची पार्श्वभूमी आहे.त्यामुळेच त्यांना रंगभूमीबद्द्ल विशेषतः मराठी रंगभूमी आणि कलाकारांबद्दल आदर आहे. याची कबुली त्यांनी वारंवार जाहिररित्या दिली आहे.याच कारणामुळे नसिरसाहेबांसोबत काम करण्यासाठी सोनाली एक्साईटेड होती. होप और हम या सिनेमाचं शुटिंग सुरु असताना मराठीवरुन दोघांमध्ये बरीच चर्चा झाली आणि वेगळे आपुलकीचे बंध निर्माण झाले. नसिरसाहेब हे अत्यंत प्रभावशाली अभिनेते असून त्यांच्यासोबत काम करणं हे भाग्य असल्याचे सोनालीने सांगितले. सिनेमाचं शुटिंग सुरु असताना प्रादेशिक सिनेमांची प्रगती याबाबत बरीच चर्चा झाल्याचे तिने सांगितले.