Join us  

संस्कृती बालगुडेला येतो 'या' एका गोष्टीचा राग, सांगितला चित्रपटगृहात घडणारा किस्सा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 11:07 AM

आपल्या अभिनयानं आणि निखळ सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.

आपल्या अभिनयानं आणि निखळ सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. छोट्या पडद्यावरील 'पिंजरा' मालिकेतील आनंदी भूमिकेमुळे संस्कृती घराघरांत पोहचली. अभिनय सोडून अनेक गोष्टींमध्ये संस्कृती निपूण आहे. संस्कृती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच तिनं एका मुलाखतीमध्य चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू असताना स्तब्ध उभं न राहणाऱ्यां लोकांबद्दल राग व्यक्त केला.

संस्कृती बालगुडे हिनं नुकतेच "मिरची मराठी"ला मुलाखती दिली. यावेळी तिनं वैयक्तिक आयुष्यातील आणि अभिनय क्षेत्रातील अनेक किस्से शेअर केले.  घरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर थिएटर असून तिला एकटीला चित्रपट बघायला जायला आवडतं, असं संस्कृतीनं सांगितलं. तसेच थिएटरमध्ये येणारे अनुभव तिनं शेअर केले. 

संस्कृती म्हणाली, 'चित्रपटगृहात लोकांचे फोन वाजतात,व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट चेक करत असतात किंवा मोठमोठ्याने हसत असतात किंवा डायलॉग रीपिट करत असतात मला त्यांच्याविषयी शून्य आदर आहे. मला हे सगळं अजिबात सहन नाही होतं. राष्ट्रगीताच्या वेळेस २ मिनिटंही स्तब्ध उभं न राहणाऱ्यांबद्दल मला अजिबात आदर नाही. दोन मिनिटांचं देखील नाहीये आपलं राष्ट्रगीत. त्यालाही तुम्हाला नीट उभं राहता येत नाही? शाळा झाल्यावर १२ किंवा २२ वर्षांनी तुम्ही ते म्हणता'.

यावेळी संस्कृतीनं थिएटरमधील एका किस्सा शेअर केला. ती म्हणाली, 'कालच मी आणि माझी मैत्रीण हॉरर फिल्म पाहण्या्साठी गेलो.  आम्ही चित्रपटगृहात फक्त दोघीच होतो. तेव्हा राष्ट्रगीत सुरू होणार होतं आणि मी माझ्या मैत्रिणीला म्हणाली, आज मी ओरडून राष्ट्रगीत म्हणणार आहे आणि ती म्हणाली, हो चालेल. आम्ही ओरडून मनसोक्त राष्ट्रगीत गायलं. जसं मी शाळेच्या संमेलनामध्ये राष्ट्रगीत म्हणायचे, तसं मी काल गायलं आणि मला जे भारी वाटलं'.

संस्कृतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा '८ दोन ७५' चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित झाला. तसेच तिने थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्याचं म्हटलं जात आहे. 'करेज' या बॉलिवूड सिनेमात ती झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय 'घे डबल' या चित्रपटातदेखील संसकृती झळकणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :संस्कृती बालगुडेसेलिब्रिटीमराठी अभिनेता