Join us

संजय कुलकर्णी नव्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 13:52 IST

नाटक व चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे संजय कुलकर्णी आता, पिंडदान या चित्रपटातून नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच ...

नाटक व चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे संजय कुलकर्णी आता, पिंडदान या चित्रपटातून नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच  आलेल्या कोती या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावली आहे.  या भूमिकेसाठी त्यांना सांकृतिक कलादर्पण पुरस्कार सोहळयात बेस्ट अ‍ॅक्टर साठी नामांकन ही मिळाले होते. संजय कुलकणी यांचा कोती हा चित्रपट ही वेगळ्या धाटणीचा होता आणि १७ जून रोजी येणारा पिंडदान चित्रपट सुद्धा वेगळ्या आशयावर मांडलेला  चित्रपट असणार आहे. पिंडदान मध्ये त्यांच वेगळं रूप सर्वांसमोर येणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बरोबर कॅनडियन कलाकार पॉलाची जोडी ही आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर मनवा नाईक या चित्रपटामध्ये सिद्धार्थची मैत्रीण दाखवली आहे. तर संजय कुलकर्णी  या चित्रपटात एका गाडीच्या ड्रायवरच्या भूमिकेत असणार आहे. मनवा व सिध्दार्थ पिंडदान या विषयावर डॉक्युमेट्री करण्यासाठी भारतात आल्यावर त्यांना गाईड करणारा आणि सल्लागार अशी संजय कुलकर्णी यांची महत्वाची  भूमिका असणार आहे.