सलमान खानसोबत संदीप पाठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 13:36 IST
बॉलिवुड सुपरस्टार सलमान खान याचा चाहतावर्ग फार मोठा आहे. तसेच सामान्य लोकांपासून ते मोठमोठे कलाकारदेखील सलमानचे फॅन्स आहेत. सलमानला ...
सलमान खानसोबत संदीप पाठक
बॉलिवुड सुपरस्टार सलमान खान याचा चाहतावर्ग फार मोठा आहे. तसेच सामान्य लोकांपासून ते मोठमोठे कलाकारदेखील सलमानचे फॅन्स आहेत. सलमानला पाहण्यासाठी आज ही अक्षरश: त्याच्या घराबाहेर चाहत्यांची रांग लागलेली असते. अशा या सुपरस्टारचा खानचा चाहता प्रेक्षकांचा लाडका अभिनेता संदीप पाठक हा देखील आहे. संदीप आणि सलमान खानचा एक झक्कास फोटो सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. या फोटोविषयी संदीप पाठक याच्याशी लोकमत सीएनएक्सने संवाद साधला असता, संदीप म्हणाला, नुकताच महेश मांजरेकर यांचा वाढदिवस झाला. त्यांच्या घरी वाढदिवसाला तो आला होता. त्यावेळी हा फोटो काढण्याची संधी मी साधली. सलमानच म्हणाल तर, एका हिरोची जी इमेज असते. तसाच तो प्रत्यक्षातदेखील आहे. तसेच त्याला पाहिल्यावर कळते की, शरीरासाठी तो बरेच कष्ट घेतो. त्यांच्याकडून शरीर कमविण्यासाठी व्यायाम सातत्याने करणे हा गुण घेण्यासारखा आहे.