Join us  

एका बुद्धिमान मैत्रिणी गेली निश:ब्द झालोय ! डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्यानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट

By गीतांजली | Published: December 01, 2020 3:54 PM

संगीतकार सलील कुलकर्णी यांनी अत्यंत भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नात व डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे यांनी सोमवारी आत्महत्या केली. डाॅ. शीतल गौतम आमटे-करजगी (वय ३९) यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आले नसले तरी नैराश्येतून विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. डॉ. शीतल करजगी आमटे यांच्या पार्थिवावर आनंदवनात डॉ. बाबा आमटे यांच्या समाधीस्थळाजवळ सोमवारी संध्याकाळी दफनविधी करण्यात आला. डॉ. शीतल यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली. संगीतकार, गीतकार, लेखक आणि गायक सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

सलील कुलकर्णी यांंनी फेसबुकवर लिहिले, ‘ताण..मनावर..कोणाचा? परिस्थितीचा? माध्यमांचा? चर्चेचा? एक बुद्धिमान मैत्रीण हकनाक गेली. नि:शब्द झालोय.. शीतल आमटे.. का गं?,’ असा शब्दांत सलील यांनी आपल्या मनातील दु:ख व्यक्त केलं आहे. 

https://www.facebook.com/saleel.s.kulkarni/posts/2429383927207609

* गौतम करजगींसोबत विवाह झाल्यानंतर दोघेही काही काळ परदेशात होते.* सन २०११-१२ मध्ये डाॅ. शीतल आमटे-करजगी आनंदवनात आल्या.* २०१४-१५ मध्ये पती गौतम करजगीसुद्धा आनंदवनात आले. * डाॅ. शीतल शिक्षण व पर्यावरणावर काम करायच्या. त्यांना पेंटिंग्जचा छंद होता.* २०१७ मध्ये त्या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. * २०१८ पासून पती गौतम करजगी यांच्याकडे आनंदवनच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी.* १७ ऑक्टोबर २०१९ रोजी संस्थेच्या सेवा कार्यात वर्तन विसंगत असल्याबाबत राजू सावसाकडे यांना महारोगी सेवा समितीचे घर खाली    करण्याबाबत नोटीस. यावरून उभयतांमध्ये आरोप- प्रत्यारोप.* लाॅकडाऊनच्या काळात डाॅ. शीतल आमटे-करजगी यांची आई भारती आमटे, भाऊ कौस्तुभ आमटे व त्यांची पत्नी पल्लवी व मुलीसह     आनंदवनातून बाहेर पडले. ते पुन्हा परतले नाही. कालांतराने डाॅ. विकास आमटे यांनीही आनंदवन सोडले.* आनंदवनातील अंतर्गत वाद अनेकदा पोलिसात गेला. मात्र कुठलीही कारवाई नाही. डाॅ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावरून          महारोगी सेवा समितीवर केलेल्या आरोपाचे २२ नोव्हेंबर रोजी आमटे कुटुंबीयांकडून जाहीर खंडन.* आनंदवनातील अंतर्गत वाद आणि कौटुंबिक वादातून डाॅ. शीतल आमटे एकाकी पडल्या होत्या. यातून नैराश्य आल्याचा अंदाज.

टॅग्स :सलील कुलकर्णीडॉ शीतल आमटेबाबा आमटे