Join us  

‘धडक’बद्दल पहिल्यांदाच आकाश ठोसरने दिली ही प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 4:39 PM

'धडक'च्या प्रदर्शनाची तारीख जवळ येताच परश्या साकारणारा आकाश ठोसरने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'सैराट' सिनेमानं चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडित काढत आणि रसिकांना झिंग झिंग झिंगाट वेड लावत सैराट सुपरडुपर हिट ठरला. या सिनेमाची कथा, यातील कलाकारांचा अभिनय, नागराज मंजुळेचे दिग्दर्शन, गाणी, संगीत, लोकेशन्स या सगळ्याच गोष्टींनी रसिकांची मनं जिंकली. सिनेमातील आर्ची आणि परशाची जादू तर आजही रसिकांवर कायम आहे.सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. म्हणूनच करण जोहरने सैराटचा हिंदीत रिमेक करण्याचं ठरवलं.

Also Read:सोशल मीडियावर सैराट फेम आकाश ठोसरच्या नावाने फसवणूक

'सैराट'चा रिमेक असलेला 'धडक' येत्या 20 जुलैला प्रदर्शित होणार आहे.धडकचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा कसा असेल, त्याची कथा, गाणी याबाबत रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. 'धडक' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर धडकच्या ट्रेलरला रसिकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला.काहींना तो आवडलाही तर काहींना आवडला नाही. प्रत्येकाने धडकबद्दल आपापले मत व्यक्त केले होते.मात्र सैराट सिनेमाच्या  टीमकडून एकही प्रतिक्रिया यावर आली नव्हती. धडकच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येताच परश्या साकारणारा आकाश ठोसरने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.धडक ट्रेलर प्रचंड आवडला असून सिनेमा पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे. जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या जोडीने तर प्रदर्शनापूर्वीच सा-यांची मनं जिंकायला सुरूवात केली आहे.त्यामुळे नक्कीच हा सिनेमा रसिकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरेल असे आकाशने दिलेल्या एका मुलाखतीत आपले मत व्यक्त केले आहे.

"मराठीत सांगितलेलं कळत न्हाय, इंग्लिशममध्ये सांगू" असं म्हणत तमाम सिनेरसिकांना अक्षरशा वेड लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु. सैराटच्या यशामुळे रातोरात स्टार बनलेल्या या अकलुजच्या कन्येकडे विविध ऑफर्स आल्या.मात्र दहावीच्या परीक्षेमुळे ती या ऑफर्स स्वीकारु शकली नाही. सैराटमधील तिचा जोडीदार परश्या म्हणजेच आकाश ठोसर दुस-या मराठी सिनेमात झळकला. रिंकू मात्र सैराटच्या कन्नड रिमेकशिवाय दुसरीकडे कुठेही झळकली नाही. त्यामुळं रिंकू मराठी सिनेमातून पुन्हा कधी भेटीला येणार याची रसिकांना उत्सुकता लागली होती. रसिकांची प्रतीक्षा संपली असून आर्ची फेम रिंकू तिच्या दुस-या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.