Join us

सचिन कुंडलकर स्मार्टफोनवर करणार या सिनेमाचं शूट, निसर्गरम्य ठिकाणी होणार चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 12:07 IST

दिवसेंदिवस सिनेमांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत.नवनवीन गोष्टींमुळे सिनेमा अधिकाधिक रसिकांना आकर्षित करण्यात यशस्वी होत आहेत. विशेषतः मराठी सिनेमा ...

दिवसेंदिवस सिनेमांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत.नवनवीन गोष्टींमुळे सिनेमा अधिकाधिक रसिकांना आकर्षित करण्यात यशस्वी होत आहेत. विशेषतः मराठी सिनेमा प्रगल्भ होत आहे. मराठी सिनेमात निरनिराळ्या गोष्टी दिग्दर्शकांकडून आजमावल्या जात आहेत. त्यामुळं की काय हे सिनेमा रसिकांकडून डोक्यावर घेतले जात आहेत. या विविध पुरस्कारांवर हे सिनेमा मोहोर उमटवत आहेत. आता असाच काहीसा प्रयोग दिग्दर्शक सचिन कुंडलकर करत आहे. लवकरच तो रसिकांच्या भेटीला 'पॉण्डेचेरी' नावाचा सिनेमा घेऊन येत आहे. शीर्षकावरुनच हा सिनेमा कथा पॉण्डेचेरीशी संबंधित असणार आहे. खुद्द सचिनने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. एरव्ही मुंबई, पुणे, कोकणात मराठी सिनेमांचं शूटिंग होतं. मात्र सचिनच्या या सिनेमाचं शूटिंग निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पॉण्डेचेरीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सचिनने दिली आहे. मात्र या पलीकडे आणखी एक खासियत सचिनच्या या सिनेमात आहे. सचिनचा हा सिनेमा पूर्णपणे स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. स्मार्टफोनवर शूटिंगचा हा अनुभव सचिनसाठी पहिलाच असणार नाही.कारण याआधी त्याने 'गुलाबजाम' या सिनेमाचा सुरुवातीचा सीन स्मार्टफोनवरच चित्रीत केला होता. आजमितीला बरेच आंतरराष्ट्रीय सिनेमांचं शूटिंग स्मार्टफोनवर चित्रीत केले जातात.मात्र पॉण्डेचेरी सिनेमा फक्त पुरस्कारासाठी करत नसल्याचे सचिनने स्पष्ट केले आहे.मराठी सिनेमांमधून वेगळंच समाधान मिळतं असं सचिनने स्पष्ट केलंय. मराठी सिनेमा हे आशयघन असतात, त्यामुळे नवनव्या गोष्टी आणि प्रयोग करायला आवडतात असंही त्यानं सांगितलंय. या सिनेमाच्या निमित्ताने लेखक तेजस मोडक आणि सचिन पुन्हा एकत्र आलेत. मात्र सिनेमाच्या कलाकारांची नावं अद्याप ठरली नसल्याचे त्याने सांगितले. असं असलं तरी या सिनेमात कोणताही नवीन कलाकार नसून सगळे रसिकांचे ओळखीचे चेहरे असतील हे सांगायलाही सचिन विसरला नाही. Also Read:जेव्हा डायरेक्टर बनतो मेकअपमॅन