Join us  

रिंकू राजगुरूने शेअर केला नो मेअकप लूकमधील फोटो, पण काहीच तासात डीलिट केला फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 5:20 PM

रिंकूने शेअर केलेल्या फोटोत रिंकू मेकअप शिवाय आपल्याला दिसत आहे. पण हा फोटो शेअर केल्यानंतर तिने काहीच तासांत तो फोटो डीलिट केला आहे. 

ठळक मुद्देया फोटोत रिंकू राजगुरूचे केस अस्ताव्यस्थ दिसत असून तिने या फोटोत अजिबातच मेकअप केलेला नाहीये. या फोटोला केवळ सहा तासांत सात हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले होते.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रिंकू मेकअप शिवाय आपल्याला दिसत आहे. पण हा फोटो शेअर केल्यानंतर तिने काहीच तासांत तो फोटो डीलिट केला. 

या फोटोत रिंकू राजगुरूचे केस अस्ताव्यस्थ दिसत असून तिने या फोटोत अजिबातच मेकअप केलेला नाहीये. या फोटोला केवळ सहा तासांत सात हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले होते. जस्ट चील आणि विथआऊट मेकअप असे या फोटोसोबत तिने हॅशटॅग दिले होते. पण तिने हा फोटो काहीच तासांत डीलिट केला. तिने हा फोटो का डीलिट केला हे अद्याप कळलेले नाही.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.

 

टॅग्स :रिंकू राजगुरू