Join us

Exclusive सरोगसीवरील चित्रपटात क्रांती -सुबोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 15:36 IST

            सरोगसी हा विषयच आपल्याकडे फार गांभीर्याने घेतला जातो. मुल होत नाही म्हणुन सरोगसी ...

            सरोगसी हा विषयच आपल्याकडे फार गांभीर्याने घेतला जातो. मुल होत नाही म्हणुन सरोगसी करायची असे म्हटले तरी डोळे आपसूकच मोठे होतात. सरोगसी बद्दल असलेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी लवकरच करार हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात आपल्याला क्रांती रेडकर, सुबोध भावे व उर्मिला कोठारे पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातील भूमिकेबद्दल क्रांतीने सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या. क्रांती म्हणाली, करार या चित्रपटात मी अत्यंत वेगळ््या भूमिकेमध्ये आहे. सरोगसी या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटातील माझी भूमिका फारच महत्वपुर्ण आहे. सरोगसी बद्दल आपल्याकडे फारच गैरसमज असतात. काहीवेळेस कुटूंब, समाज या गोष्टींना स्वीकारत नाही. त्यामुळे सरोगसी म्हणजे नेमके काय ? सरोगसीचे फायदे आणि तोटे, मुल होत नसेल तर काय करायचे. या सर्वच गोष्टींवर चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. सुबोध-क्रांती आणि उर्मिला हे तिघे प्रथमच आपल्याला चित्रपटात एकत्र पहायला मिळणार आहेत. काही वर्षांपुर्वी आलेल्या चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातून देखील सरोगसी हा विषय समोर आला होता. आता या चित्रपटात आपल्याला काय नवीन पहायला मिळणार हे लवकरच समजेल.