Join us  

गायिका 'सावनी रविंद्र'चीच रंगलीय सध्या चर्चा, काय आहे यामागे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 10:54 AM

सावनी रविंद्रच्या इंस्टाग्रामवरही फॉलोअर्सचा संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहतेही तिच्या नवीन गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात.

आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे 'सावनी रविंद्र'. लॉकडाऊन नंतर ती प्रथमच ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात झळकली होती. सावनी सोशल मिडीयावर देखील अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तीच्या लेटेस्ट फोटोशूटचे ग्लॅमरस फोटोज् सोशल मिडीयावर पोस्ट केले होते. सावनीने मराठीसह, हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचे भारतातचं नव्हे तर जगभरात प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय तिने इंस्टाग्रामवरही तिच्या फॉलोअर्सचा संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहतेही तिच्या नवीन गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात.

 गायिका सावनी तिच्या चाहत्यांना वर्षाअखेरीस एक सांगितीक भेट देणार आहे. याविषयी ती म्हणते, ''२०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच खूप चढउताराचं होतं. या वर्षाचा शेवटं गोडं करण्यासाठी आणि माझ्या सर्व फॅन्ससाठी मी नविन मॅशअप गाणं घेऊन येत आहे. त्यावर मी सध्या काम करत आहे.

 

या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात माझ्या ऑफिशीअल युट्यूब चॅनेलवर ते गाणं रिलीज होईल. तसेच मी माझ्या युट्यूुब चॅनेलवरून दर महिन्यातून एकदा लाईव्ह जॅमिंग सेशन सुरू करणार आहे. जेणेकरून माझं चाहत्यांप्रतीचं प्रेमं मी व्यक्तं करू शकेन.''गायिका सावनी रविंद्र तिच्या चाहत्यांसाठी वर्षाअखेरीस कोणतं नवं गाणं घेऊन येत आहे. हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेलं.

Birthday Special : बर्थ डेच्या दिवशी सावनीने केले असे काही, वाचून तुम्ही म्हणाल जिंकलंस पोरी

सावनी रविंद्र अशा वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्याबाबत सांगते, “फक्त पार्टी करून आणि गिफ्ट्स घेऊन वाढदिवस साजरा करणे, मला कधीच आवडले नाही. माझ्या वाढदिवशी कोणातरी गरजू व्यक्तिच्या चेह-यावर हसु फुलवावे, आणि त्या व्यक्तिला आवश्यक भेटवस्तू द्यावी असे मला फार पुर्वी पासूनच वाटायचे आणि मग त्यातूनच मी वाढदिवस अशा वेगळ्या पध्दतीने दरवर्षी साजरा करयचा संकल्प सोडला. जो दरवर्षी मी पूर्णही करतेय, ह्याचा अर्थातच मला आनंद आहे.”