Join us  

रवी जाधवनं दर्शवला यंटम मराठी सिनेमाला पाठिंबा,या दिग्गज अभिनेत्यामुळे आनंदाला उरला नाही पारावार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 6:26 AM

मराठी सिनेमाला चांगले दिवस आले आहेत असं सध्या कायमच ऐकायला मिळतं. कारण मराठीत विविध विषयाचे सिनेमा येत आहेत.अनेक गुणी ...

मराठी सिनेमाला चांगले दिवस आले आहेत असं सध्या कायमच ऐकायला मिळतं. कारण मराठीत विविध विषयाचे सिनेमा येत आहेत.अनेक गुणी आणि प्रयोगशील दिग्दर्शक आशयघन असलेले सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. बॉलिवूडच्या सिनेमाला टक्कर देणा-या सिनेमांची निर्मिती मराठीत होत आहे.त्यामुळे आजघडीला हिंदीतील मंडळीही मराठी सिनेमांचं कौतुक करण्यासह त्यांची निर्मितीही करत असल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र किंवा भारतातच नाही तर सातासमुद्रापारही ऑस्करसह विविध पुरस्कारांमध्येही मराठी सिनेमाचा डंका वाजतो आहे.त्यामुळे मराठी सिनेमांना पुढे नेण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. असंच काहीसं 'यंटम' या आगामी मराठी सिनेमाबाबतही घडलं आहे.एक दिग्दर्शक,निर्माता आणि अभिनेता म्हणून रवी जाधवनं एकाहून एक हिट सिनेमा दिले आहेत.दर्जेदार विषय आणि वेगळी कलाकृती असलेल्या सिनेमांना रवी जाधवनं निर्माता म्हणून कायमच प्रोत्साहित केले आहे.आता यंटम या मराठी सिनेमाच्या प्रस्तुतीचा निर्णय रवी जाधव घेतला आहे. रवी जाधव प्रस्तुत या सिनेमाच्या सहनिर्मितीची जबाबदारी अतुल ज्ञानेश्वर काळे यांनी घेतली आहे.दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.यंटम ही पौगंडावस्थेतील लव्हस्टोरी आहे.ग्रामीण भागाच्या बॅकड्रॉपवर रंगणारी यंटम ही लव्हस्टोरी आहे.यांत 'यंटम' म्हणजे वेडेपण पाहायला मिळेल असं रवी जाधवला वाटतं.प्रेमासाठी वाट्टेल ती करण्याची तयारी या कथेतील नायक-नायिकांमध्ये पाहायला मिळेल.'यंटम' हा एक वेगळा सिनेमा ठरेल असा विश्वास रवी जाधवला वाटतो आहे. रवी जाधवने कायमच तरुण दिग्दर्शकांना पाठिंबा दर्शवला आहे.'रेगे' सिनेमाचा दिग्दर्शक अभिजीत पानसे,'कॉफी आणि बरंच काही' सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनाही रवी जाधवने संधी दिली होती.आता 'यंटम' या सिनेमाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील यांची या यादीत भर पडली आहे.शिवाय 'यंटम' या सिनेमातून प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांच्यासह काम करण्याची संधी मिळाल्यामुळे रवी जाधव भलताच खुश आहे.तसंच या सिनेमातून अनेक नवे चेहरेही पाहायला मिळणार आहेत. Also Read:फेसबुकवरून सापडला यंटमचा हिरो!सोशल मीडियाचा वापर केवळ टाइमपाससाठीच होतो असं नाही, तर त्यातून अनेकदा सरप्राइजेसही मिळतात. निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांच्या शार्दूल फिल्म्स अँड एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत, समीर आशा पाटील दिग्दर्शित 'यंटम' या चित्रपटातल्या हिरोची निवड ही चक्क फेसबुकवरून झाली आहे. सांगलीच्या वैभव कदमने ही भूमिका साकारली असून या चित्रपटातून तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.