राकेश बापटने बासरीवर वाजविले राष्ट्रगीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 20:21 IST
अभिनेता राकेश बापट याने भारतीयांना आगळयावेगळया पद्धतीने स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राकेश याने अत्यंत सुंदररीत्या बासरी वाजवून स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. त्याने बासरी वाजवितानाचा एक व्हिडीओ सोशलमिडीयावर अपडेट केला आहे.
राकेश बापटने बासरीवर वाजविले राष्ट्रगीत
अभिनेता राकेश बापट याने भारतीयांना आगळयावेगळया पद्धतीने स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राकेश याने अत्यंत सुंदररीत्या बासरी वाजवून स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. त्याने बासरी वाजवितानाचा एक व्हिडीओ सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. त्याच्या या व्हिडीओला फार कमी वेळात अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याच्या या व्हिडीओबद्दल लोकमत सीएनएक्सशी बोलताना राकेश म्हणाला, मला लहानपणापासून बासरी वाजवण्याची आवड होती. म्युझिकलची मला फार आवड आहे. राष्ट्रगीत ही माझी बेस्ट टयून आहे. ते वाजविताना खरचं खूपच छान वाटतं. राकेश बापट याने नुकतेच वृदावंन या चित्रपटातून मराठी चित्रपटातून पदापर्ण केले आहे.