राजेश म्हापुसकर यांचे मराठीत पदापर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 15:24 IST
बॉलीवुडचा सुपरहीट चित्रपट फरारी की सवारी या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश म्हापुसकर हे मराठी इंडस्ट्रीमध्ये पदापर्ण करत आहे. राजेश हे ...
राजेश म्हापुसकर यांचे मराठीत पदापर्ण
बॉलीवुडचा सुपरहीट चित्रपट फरारी की सवारी या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश म्हापुसकर हे मराठी इंडस्ट्रीमध्ये पदापर्ण करत आहे. राजेश हे प्रियांका चोप्राच्या व्हेटिंलेटर या चित्रपटातून मराठीमध्ये पादापर्ण करणार आहे. त्यांनी बॉलीवुडमध्येदेखील मुन्नाभाई एम. बी. बी. एस. , लगे रहो मुन्नाभाई , 3 इडियट्स या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रियंका चोप्रादेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारदेखील झळकणार आहे.