Join us

पुजाला आवडते मोफत पाणीपुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 15:13 IST

            पाणीपुरी पाहिली तरी तोंडाला पाणी आल्या शिवाय राहत नाही. पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण करणारे ...

 
           पाणीपुरी पाहिली तरी तोंडाला पाणी आल्या शिवाय राहत नाही. पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण करणारे स्टार्स जरी असले तरी रस्त्यावर पाणीपुरी दिसली की ती खाण्याचा मोह काही कलाकारांना आवरता येत नाही. असेच काही झाले आहे अभिनेत्री पुजा सावंत बाबत. पुजाला पाणीपुरी खायला खुपच आवडते. पण यात एक गंमत आहे बरंका. पुजाला मोफतची पाणीपुरी खायला जास्त आवडते. असे आम्ही सांगत नाही तर पुजाने खुद्द सोशल साईट्सवर असे सांगितले आहे.  पुजा म्हणते, मोफत मिळणाºया पाणीपुरीपेक्षा कोणताच पदार्थ जास्त स्वादिष्ट असू शकत नाही. एवढेच नाही तर पाणीपुरी खाल्ल्यानंतर मिळणारी मसाला पुरी आख्खी तोंडात टाकण्याची मजा काही वेगळीच असते. पण ते काहीही असले तरी पुजा सध्या मोफतची पाणीपुरी कोण खाऊ घालतय का ? याच्याच शोधात तर नाही ना