प्रियाची तीन वेगवेगळी रूपे प्रेक्षकांसमोर येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 17:23 IST
नावाप्रमानेच ही दोघींची कथा....त्यांच्या वाटा वेगळ्या पण मार्ग एकच... विचार वेगळे पण आवड एकच...त्या वेगळ्या, पण तरीही एकच.... ही ...
प्रियाची तीन वेगवेगळी रूपे प्रेक्षकांसमोर येणार
नावाप्रमानेच ही दोघींची कथा....त्यांच्या वाटा वेगळ्या पण मार्ग एकच... विचार वेगळे पण आवड एकच...त्या वेगळ्या, पण तरीही एकच.... ही कथा आहे अमला आणि सावित्री सरदेसाई या दोघींची. ‘आम्ही दोघीं'मधील दोघींची. येत्या १६ फेब्रुवारी रोजी रसिकांसामोर येणारी. पहिल्या टीझरमधून ती रसिकांच्या भेटीला संक्षिप्त पद्धतीने आली आहे आणि ती पाहताना त्यातील वेगळेपणही अधोरेखित होते. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच ताणली जाते.या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील सावित्री म्हणजे प्रिया बापट तीन वेगवेगळ्या रुपांत आपल्याला भेटणार आहेत. तीन वेगळ्या वयोगटांतील तिची ही रूपे मोहक आहेत. “एकदा वाटलं ना कि करून टाकायचं, मग हाळहळ वाटत नाही,” असे ती अमला म्हणजे (मुक्ता बर्वे) हिला सांगते. टीजरमधून समोर येणाऱ्या वाक्यातून तिचे व्यक्तिमत्व उलगडत जाते. अमलाचे व्यक्तिमत्वही तिच्या दोन-चार छटांमधून समोर येते, आणि हा चित्रपट ‘हट के’ आहे, ही बाब मनोमन पटते.चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या या आगामी मराठी चित्रपटात वेगळ्या भूमिका आहेत.एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री,कॉस्चुम डीझायनर व सह-दिग्दर्शक म्हणून चित्रपट रसिकांना माहित असलेल्या प्रतिमा जोशी यांचे दिग्दर्शनीय पदार्पण ‘आम्ही दोघी’मधून होत आहे.“आम्ही दोघी’ ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे.यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टीकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टीकोनही ध्यानात घेतला पाहिजे हि बाब या चित्रपटात अधोरेखीत होते. त्यामुळेच ती आजच्या प्रत्येक तरुणीला आपली गोष्ट वाटेल व त्यांच्या संवेदनशिलतेला स्पर्श करून काही गोष्टीचा विचार करायला भाग पाडेल,”असे उद्गार दिग्दर्शक प्रतीमा जोशी यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना काढले.