Join us  

अशी ही बनवाबनवीच्या वेळी प्रिया बेर्डे होत्या अवघ्या १८ वर्षांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:09 PM

प्रिया बेर्डे यांच्या आई या अभिनेत्री तर वडील हे दिग्दर्शक होते. त्यामुळे अभिनयाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. बालपणापासूनच त्यांना नृत्याची प्रचंड आवड होती. त्यांनी खूपच लहान वयात माया जाधव यांच्याकडे नृत्य शिकायला सुरुवात केली. वयाच्या 12 व्या वर्षीपासून त्यांनी नृत्याचे कार्यक्रम केले

प्रिया बेर्डे यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सगळ्यात जास्त लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केले. त्या दोघांची जोडी त्या काळात चांगलीच गाजली होती. प्रिया यांचे माहेरचे नाव प्रिया अरुण असे होते. त्यांचे लग्न लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत झाले असून त्यांना अभिनय आणि स्वानंदी अशी दोन मुले आहेत.

प्रिया बेर्डे यांच्या आई या अभिनेत्री तर वडील हे दिग्दर्शक होते. त्यामुळे अभिनयाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. बालपणापासूनच त्यांना नृत्याची प्रचंड आवड होती. त्यांनी खूपच लहान वयात माया जाधव यांच्याकडे नृत्य शिकायला सुरुवात केली. वयाच्या 12 व्या वर्षीपासून त्यांनी नृत्याचे कार्यक्रम केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी लहान वयातच विविध देशांना भेटी दिल्या. त्यांचे शिक्षण हे मुंबईतच झाले. मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच त्यांची नृत्याची आवड त्या जोपासत होत्या. त्यांच्या नृत्याचे सगळीकडेच कौतुक होत होते. त्याच दरम्यान त्यांना व्ही. शांताराम यांनी तेरा पन्ने या हिंदी मालिकेत काम करण्याची ऑफर दिली आणि अशाप्रकारे त्यांचा अभिनयक्षेत्रात प्रवेश झाला. यानंतर त्यांना अशी ही बनवाबनवी या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी खूपच कमी वेळात यशाचे शिखर गाठले. या चित्रपटाच्या वेळी त्या केवळ १८ वर्षांच्या होत्या. या चित्रपटात प्रिया बेर्डे यांच्यासोबत अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता जोशी सराफ, विजू खोटे, नयनतारा, सुधीर जोशी, सिद्धार्थ आणि सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. प्रिया अरुण यांनी हम आपके है कौन, बेटा, जान, अनाडी यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.