Join us  

मेकअपशिवाय देखील प्रार्थना बेहरे दिसते तितकीच सुंदर, तिनेच शेअर केला सोशल मीडियावर व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:12 PM

प्रार्थना बेहरेने शेअर केलेल्या या व्हिडिओत ती झोपेतून नुकतीच उठलेली दिसत आहे. तिने या व्हिडिओद्वारे तिच्या चाहत्यांना गुड मॉर्निंग केले आहे. तिच्या या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देया व्हिडिओत तिने अजिबातच मेकअप केलेला नाहीये. पण तरीही प्रार्थना खूपच छान दिसत आहे. प्रार्थनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओला केवळ सात तासांत एका लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. नुकतेच प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतील तिचा लूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 

प्रार्थना बेहरेने शेअर केलेल्या या व्हिडिओत ती झोपेतून नुकतीच उठलेली दिसत आहे. तिने या व्हिडिओद्वारे तिच्या चाहत्यांना गुड मॉर्निंग केले आहे. तिच्या या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण या व्हिडिओत तिने अजिबातच मेकअप केलेला नाहीये. पण तरीही प्रार्थना खूपच छान दिसत आहे. प्रार्थनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओला केवळ सात तासांत एका लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

प्रार्थना बेहरेने काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये छूमंतर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तिथे शूटिंग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

छूमंतर शिवाय प्रार्थना एका हिंदी वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. याआधी तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात तिने काम केलं आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरे