तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाई राणाला नव्हे तर या व्यक्तीला म्हणतात, डार्लिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 17:40 IST
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाई राणाला नव्हे तर एका दुसऱ्याच व्यक्तीला डार्लिंग म्हणत आहेत. जाणून घ्या कोण व्यक्ती आहे ती...
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाई राणाला नव्हे तर या व्यक्तीला म्हणतात, डार्लिंग
तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे अक्षया देवधर हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेत तिने साकारलेली अंजलीबाईची भूमिका प्रेक्षकांनी सध्या अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. अक्षरा सध्या तिच्या मालिकेसोबतच आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. अक्षरा आणि का रे दुरावा या मालिकेमुळे नावारूपाला आलेला सुयश टिळक हे नात्यात असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटला ते दोघे एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच पोस्ट करत असतात. या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असते.सुयशने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या एका फोटोची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या फोटोत सुयशसोबत आपल्याला अक्षया पाहायला मिळत आहे. हा फोटो त्याने फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने पोस्ट केला होता. त्याने या फोटोसोबत खूप छान पोस्ट देखील लिहिली आहे. त्याने पोस्टमध्ये हॅपी फ्रेंडशिप डे... कारण तू सगळ्यात पहिली माझी लाडकी मैत्रीण आहेस... असे लिहिले आहे. या त्याच्या पोस्टवरून या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा नक्कीच काहीतरी जास्त असल्याची चर्चा रंगली आहे आणि एवढेच नव्हे तर या सुयशच्या पोस्टला अक्षयाने देखील खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तिने म्हटले आहे की, सेम टू यू डार्लिंग... तू माझा मित्र आणि सर्व काही आहेस. सुयशने फोटो आणि त्यासोबत ही पोस्ट लिहिल्यापासून त्या दोघांना त्यांचे फॅन्स त्यांची जोडी खूप छान असल्याचे प्रतिक्रियांद्वारे सांगत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील देत आहेत.सुयश टिळकने दुर्वा या मालिकेत देखील काम केले होते. पण त्याला खरी ओळख का रे दुरावा या मालिकेतील जय या व्यक्तिरेखेने मिळवून दिली तर अक्षयाच्या तुझ्यात जीव रंगला या पहिल्याच मालिकेने तिला प्रेक्षकांचे प्रेम मिळवून दिले आहे. सुयश आणि अक्षया हे दोघेही पुण्याचे असून सध्या ते त्यांच्या कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाले आहेत. Also Read : तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर सुयश टिळकला म्हणतेय, Missing You …Love