Join us

​आदेश बांदेकर सांगतात, माझ्या अपघातामुळे मी ही गोष्ट नक्कीच शिकलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 16:19 IST

महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून प्रसिद्ध असणारे अभिनेते आदेश बांदेकर यांच्या कारला काहीच दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता. आदेश बांदेकर ...

महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून प्रसिद्ध असणारे अभिनेते आदेश बांदेकर यांच्या कारला काहीच दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता. आदेश बांदेकर कारने कोल्हापुरच्या दिशेने जात असताना कराड रोडवर हा अपघात झाला होता. सुदैवाने आदेश बांदेकर या अपघातातून बचावले. सिद्धिविनायक मंदिराच्या वतीने एक कोटींचा धनादेश कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यासाठी ते चालले होते. यावेळी पुढच्या ट्रकमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने बांदेकर यांची मागून येणारी गाडी त्यावर आदळली. त्यामुळे त्यांच्या गाडीचा पुढचा भाग चेपला गेला. यावेळी कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. आदेश बांदेकर यावेळी त्यांच्या फॉर्च्यूनर गाडीने प्रवास करत होते. यावेळी त्यांच्यासोबत सिद्धीविनायक मंदिराचे आणखी काही विश्वस्त देखील होते.आदेश बांदेकर यांनी सीट बेल्ट लावला असल्या कारणाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे आदेश बांदेकर हे एक गोष्टी नक्कीच शिकले आहेत. या अपघातानंतर दिेलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, सीट बेल्ट लावण्याचे आवाहन नेहमी केले जाते. पण ते किती महत्त्वाचे आहे हे मी या अपघातामुळे स्वत: अनुभवले. त्यामुळे गाडीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने सीट बेल्ट लावणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते. होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर लोकांच्या घरातघरात पोहोचले. या मालिकेतील त्यांचे सूत्रसंचालन लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात भावोजी म्हणूनच ओळखले जाते. आदेश चित्रीकरणानिमित्त लोकांच्या घरी गेल्यावर त्यांच्या मधील एक होऊन जातात. मी एक सेलेब्रिटी आहे याचा आव ते कधीच आणत नाही. त्यामुळे त्यांची हीच गोष्ट सर्वसामान्य लोकांना फार आवडते. आदेश बांदेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ताक धिना धिन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. तसेच हफ्ता बंद, एका पेक्षा एक यांसारख्या अनेक कार्यक्रमात त्यांनी सूत्रसंचालकाची भूमिका साकारली आहे. आदेश हे एक अभिनेते असण्यासोबतच सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असून शिवसेना नेते देखील आहेत. Also Read : अशाप्रकारे आदेश बांदेकर यांनी प्रपोज केले होते सुचित्रा बांदेकर यांना