Join us  

राम नवमीच्या मुहूर्तावर अयोध्यानगरीत राम ललाच्या चरणी मराठमोळ्या गायिकेचा परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:40 AM

राम नवमीच्या मुहुर्तावर अयोध्येत मराठमोळ्या गायिकेने खास नृत्याचं सादरीकरण केलंय. त्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत (ayodhya, ram mandir)

आज रामनवमी. संपूर्ण भारतात रामनवमी उत्साहात साजरी होताना दिसत आहे. अयोद्धा राम मंदिराची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच अयोध्येत रामनवमीचा जल्लोष साजरा होताना दिसत आहे. भारतातील लाखो भाविक रामललाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला एकत्र आले आहेत. आजच्या खास दिवशी मराठमोळ्या गायिकेला रामललाच्या चरणी गायनसेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्या गायिका म्हणजे देवकी पंडीत. 

देवकी पंडीत यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत. या फोटोत देवकी त्यांच्या गायनाच्या ग्रुपसोबत दिसत आहेत. त्यांनी राम नवमीच्या मुहुर्तावर अयोध्याराम मंदिरातले हे खास फोटो शेअर केलेत. फोटोत पाहायला मिळेल की, देवकी पंडीत रामललाचं दर्शन घेत आहेत. आणि पुढे त्यांच्या ग्रुपसोबत देवकी पंडीत श्री राम लला रागसेवा कार्यक्रमात गायन करताना दिसत आहेत.

देवकी पंडीत हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी नवं नाही. देवकी यांनी आजवर विविध सिनेमांमधून आणि विशेषतः मालिकांच्या शीर्षक गीतांमधून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. 'वादळवाट', 'या सुखांनो या', 'अवघाचि संसार' अशा विविध मालिकांच्या शीर्षक गीतांमधून देवकी यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःची छाप पाडली आहे. देवकी विविध ठिकाणी त्यांच्या गायनाचे कार्यक्रम करत असतात.

टॅग्स :अयोध्याराम मंदिरराम नवमी