Join us

OMG ! ​आर्ची-परशात दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 12:39 IST

सैराट चित्रपटाच्या माध्यमातून रातोरात सुपरस्टार झालेले आर्ची व परशा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यांच्या अभिनयाच्या शैलीने संपूर्ण भारतासह विदेशातीलही ...

सैराट चित्रपटाच्या माध्यमातून रातोरात सुपरस्टार झालेले आर्ची व परशा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यांच्या अभिनयाच्या शैलीने संपूर्ण भारतासह विदेशातीलही चाहत्यांना याड लावलं. आजपर्यंत सैराटने बॉक्स आॅफिसवर 85 कोटीहून अधिक कमाई केली असून 100 कोटींच्या दिशेने याची घोडदौड वेगाने सुरु आहे. शूटिंगच्या आधी या दोघांची एकमेकांशी ओळख नव्हती. मात्र शूटिंगदरम्यान त्यांची चांगली ओळख झाली. चित्रपट रिलीज होण्याआधी प्रोमोशनल अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये हे दोघं एकत्र दिसले होते.मात्र मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा आहे. एकमेकांचे चांगले मित्र असणारे रिंकू आणि आकाश एकमेकांना टाळत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. दरम्यान, त्यांच्यातील दुरावाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र दोघेही प्रमोशनल इव्हेंटमध्ये मात्र एकत्र दिसतात.