कलाकारांच्या बाबतीत अनेक गोष्टी अशा असतात ज्यावर त्यांच्या फॅन्सची नजर असतेच असते. मग ते कलाकारांचे आगामी प्रोजेक्ट्स असो किंवा त्यांचा लूक.
अभिनेता ललित प्रभाकर याने मराठी मालिका आणि नाटकात काम केले आहे. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील आदित्य देसाई ची भूमिका साकारणारा ललित प्रभाकर याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. तरुणींचा आवडता हिरो ललित प्रभाकर याचा लूक सर्वांना आवडायचा.
ललितची उंची, त्याच्या केसाची रचना आणि स्माईल या सर्व गोष्टीवर त्याचे फॅन्स फिदा आहेत. पण आता अशी चर्चा आहे की ललितने त्याचा लूक बदलला आहे. अहो फक्त चर्चा नाही तर १०० टक्के खरंय हे.
नुकताच ललितने त्याच्या लूकवर एक्सपरिमेंट केलंय. त्याने त्याचा लूक बदलला आहे. ललित या लूकमध्ये पण हॅंडसम आणि स्मार्ट वाटतोय. त्याच्या फॅन्सना पण हा ललितचा नवा लूक नक्कीच आवडला असणार.
ललित प्रभाकरच्या आधीच्या लुक्समधील काही फोटो-