Join us  

मराठीतील या दबंग गर्लचा फोटो होतोय व्हायरल, ओळखलंत का तिला?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 2:12 PM

तू मराठी दबंग गर्ल असून दबंग 4 मध्ये तुलाच घेतील असे म्हणत तिचे फॅन्स तिची स्तुती करत आहेत.

ठळक मुद्देरिंकूने शेअर केलेल्या या फोटोत तिने गॉगल घातला असून तिचा हा डॅशिंग अंदाज तिच्या फॅन्सना चांगलाच भावत आहे. तू या फोटोत खूपच छान दिसत असून तुझा डॅशिंग अंदाज आम्हाला भावत असल्याचे फॅन्सने प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगितले आहे.

'सैराट'मधील आर्ची उर्फ रिंकू राजगुरू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. तिने काहीच महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एंट्री घेतली असली तरी खूपच कमी वेळात तिला सोशल मीडियावर खूपच चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे. 

नुकताच रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत रिंकूचा एक वेगळाच अंदाज तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोत तिने गॉगल घातला असून तिचा हा डॅशिंग अंदाज तिच्या फॅन्सना चांगलाच भावत आहे. तू या फोटोत खूपच छान दिसत असून तुझा डॅशिंग अंदाज आम्हाला भावत असल्याचे फॅन्सने प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगितले आहे. तसेच गोरे गोर मुखडे पे काला काला चष्मा असे म्हणत एका तिच्या चाहत्याने तिची स्तुती केली आहे. तू मराठी दबंग गर्ल असून दबंग 4 मध्ये तुलाच घेतील असे देखील एका फॅनने म्हटले आहे. 

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग, तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. 

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरूने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आता तर रिंकूचा चांगलाच मेकओव्हर झाला असून स्टायलिश रिंकू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता तिचा मेकअप हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरू