नेहा आणि ललितची हटके जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 11:35 IST
Exclusive : बेनझीर जमादार नेहा महाजन आणि ललित प्रभाकर यांची हटके जोडी रूपेरी पडदयावर झळकणार आहे. नेहाने यापूर्वी यूथ, फ्रेन्ड्स, ...
नेहा आणि ललितची हटके जोडी
Exclusive : बेनझीर जमादार नेहा महाजन आणि ललित प्रभाकर यांची हटके जोडी रूपेरी पडदयावर झळकणार आहे. नेहाने यापूर्वी यूथ, फ्रेन्ड्स, निळकंठ मास्तर यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तर ललित जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे.ललितचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटाविषयी नेहा महाजन सांगते, 'आम्ही दोघे कामाच्या बाबतीत खूप चोख आहोत. ललित तर आपले काम खूपच जबाबदारीने पार पाडतो. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खरंच खूप चांगला होता.तसेच यापूर्वी आम्ही दोघांनी टॉकिंग लाइट हाऊस नावाचा एक शो केला होता. त्यामुळे ललितची आणि माझी खूप छान मैत्री आहे. तसेच या चित्रपटात प्रेक्षकांना माझी आणि ललितची एक इंटरेस्टिंग लव्हस्टोरी पाहण्यासाठी तुम्हाला थोडया दिवसांची वाट बघावी लागणार आहे.