Join us  

माझी मराठीची बोलु कौतुके

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2017 5:33 AM

   बेनझीर जमादार     आज मराठी राजभाषा दिन. कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला ...

   बेनझीर जमादार     आज मराठी राजभाषा दिन. कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मराठी भाषेचा वारसा जपावा यासाठी विविध उपक्रमही साजरे केले जातात.  मराठी भाषा दिनाकडे मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार कसे पाहतात, मराठी भाषेसंदर्भात त्यांना काय वाटते? मराठीच्या संवर्धनासाठी कोणते प्रयत्न व्हायला हवे आहेत, याबाबत कलाकारांनी लोकमत सीएनएक्ससोबत आपल्या भावना व्यक्त केल्या.तेजस्विनी पंडीत - केवळ मराठी भाषा दिनानिमित्तानेच एका दिवसाचे महत्त्व असू नये. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आई-वडील सतत आपल्यासोबत असतात अगदी त्याचपद्धतीने मराठी भाषेचेही असावे. मराठी माणूस ज्या गोष्टींसाठी बदनाम आहे, ती गोष्ट सुधारण्याची संधी मला मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. या दिनानिमित्ताने आवर्जून सांगते, मी महाराष्टÑीयन असल्याचा, मराठी भाषा बोलत असल्याचा, तसेच मराठी कुटुंबात जन्माला आल्याचा मला अभिमान आहे.सोनाली कुलकर्णी - महाराष्ट्रात मराठी भाषेचा वारसा जपा, हे सांगावे लागते हे किती मोठे दुर्दैव.  या दिनानिमित्त वेगवेगळया पध्दतीने भाषा जनजागृतीविषयक उपक्रम राबविले जातात हे खरचं कौतुकास्पद आहे. तसेच आताच्या युगात  सोशल मीडियावर ही मराठी भाषा जपण्याचा चांगला प्रयत्न केला जातो.  काही दिवसांपूर्वी ट्विटर संमेलन झाले. यामध्ये मराठी कलाकारांनी आणि तरूणांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता. एकंदरीतच जिथे शक्य होईल तिथे मराठी भाषेचा प्रसार केलाच पाहिजे.आलोक राजवाडे - मराठी भाषा ही विशेषत: सक्षमच आहे. त्यामुळे तिचे आपले महत्त्व आहे. फक्त प्रत्येक व्यक्तीने मराठी भाषा ही कोल्हापूर, सोलापूर, विदर्भ असो या खान्देशी प्रत्येक भाषेचा मनापासून आदर करणे गरजेचे आहे.  वेगवेगळया लहज्यामधील मराठी भाषा ही प्रेमाने समजून घेतली पाहिजे, तर ही भाषा टिकेल असे मला वाटते. सुयश टिळक - माझ्यासाठी मराठी भाषा दिन खूप महत्त्वाचा आहे. खरं सांगू का, या दिवसापुरतेच मराठी भाषेविषयी प्रेम जागृत होऊ नये. त्यासाठी लिहिले जाणारे साहित्य रोज मला वाचावयास मिळावे. या भाषेत लिहिले जाणारे साहित्य रोज आपल्या वाचनात यावे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. तरच खºया अर्थाने मराठी भाषा जपली जाईल. संस्कृती बालगुडे - मराठी माणसं ही मराठी कमी बोलतात असं चित्र पाहायला मिळतं. खरं तर अस होता कामा नये. माझ्याकडूनही या गोष्टी होतात, पण मी नक्कीच मराठीत बोलण्याचा प्रयत्न करेन. मी मराठी चित्रपटसृष्टीत आल्यापासून माझी मराठी अधिक छान झाली आहे. मराठी भाषेबरोबरच इतर भाषेचा अपमान करू नये. मराठी भाषा दिन या दिवसानिमित्त माझ्यावतीने सर्वांना मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.