माझी हौसा हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 16:59 IST
दहीहंडी उत्सवाची आणि गणरायाच्या आगमनाचे, सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. या उत्साहासाठी प्रेक्षकदेखील नवीन व दमदार गाण्यांची वाट पाहत ...
माझी हौसा हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
दहीहंडी उत्सवाची आणि गणरायाच्या आगमनाचे, सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. या उत्साहासाठी प्रेक्षकदेखील नवीन व दमदार गाण्यांची वाट पाहत असतात. प्रेक्षकांचा हाच आनंद द्विगुणित करण्यास गायक मकरंद सरदेशमुख यांचे माझी हौसा हे लोकगीत रसिकांसाठी सज्ज झाले आहे. या गाण्याला युट्युबवर अवघ्या काही दिवसात ६००० लाइक मिळाले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना गाण्यावर नाचता येईल असे धमाकेदार लोकगीत तरूणांच्या नक्कीच पसंतीस पडेल.