Join us  

मिताली मयेकरच्या हाताला लागली सिद्धार्थ चांदेकरच्या नावाची मेहंदी, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 1:00 PM

सिद्धार्थ आणि मितालीच्या मेहंदी सेरमनीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

ठळक मुद्देसिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मिताली आणि त्याच्या तोंडावर हास्य पाहायला मिळत आहे. तसेच एका फोटोत सिद्धार्थसोबत त्याची आई देखील दिसत आहे.

सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. त्यामुळेच मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर, मानसी नाईक आणि आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्याही लग्नाचे सूर ऐकायला मिळत आहेत.

सिद्धार्थ आणि मितालीची हळद आणि संगीत सेरमनी नुकतीच पार पडली. त्यांनी त्यांच्या हळद आणि संगीत सेरमनीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते आणि आता त्यांनी त्यांच्या मेहंदी सेरमनीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मिताली आणि त्याच्या तोंडावर हास्य पाहायला मिळत आहे. तसेच एका फोटोत सिद्धार्थसोबत त्याची आई देखील दिसत आहे.

सिद्धार्थ आणि मितालीचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. त्यांच्या या फोटोंना काहीच तासाच अनेक लाईक्स मिळाले असून अनेकांनी या फोटोवर कमेंट केले आहे. मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर तो क्षण आला आणि आता हे कपल त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दोघांचं लग्न पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्यामध्ये होणार आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं.

लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते चाहत्यांसह शेअर करत असतात. तसेच त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करत कपल गोलही देताना दिसायचे. चाहत्यांनाही त्यांचे केमिस्ट्री खूप पसंत येते. त्यामुळे त्यांच्या फोटोंना चाहतेही खूप सारे लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर