Join us  

Video : ‘अगं जुईली बाळाला अंघोळ तरी घालायची...’, चाहते जोमात, रोहित-जुईली कोमात!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 10:19 AM

Rohit Raut Juilee Joglekar Video : व्हिडीओत रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर हे क्यूट कपल सुरेल आवाजात ‘हम दिल दे चुके’ या सिनेमातील ‘चांद छुपा बादल में’ हे गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे आणि यातल्या काही कमेंट्स चांगल्याच मनोरंजक आहेत.

Rohit Raut  Juilee Joglekar Video : गायक रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) गेल्या 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकले. पुण्यातील  ढेपे वाड्यात थाटामाटात हा लग्नसोहळा संपन्न झाला होता. लग्नाना उणेपुरे तीन महिने झालेत. लग्नाची नवलाई कायम आहे आणि शिवाय धम्माल व्हिडीओ शेअर करण्याचा ‘सिलसिला’ही सुरू आहे. तूर्तास रोहित व जुईली यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत हे क्यूट कपल सुरेल आवाजात  ‘हम दिल दे चुके’ या सिनेमातील ‘चांद छुपा बादल में’ हे गाणं गाताना दिसत आहे.

रोहित व जुईलीच्या आवाजातील व्हिडीओतील गाणं तुम्ही ऐकायलाच हवं. शिवाय या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सही वाचायला हव्यात. या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे आणि यातल्या काही कमेंट्स चांगल्याच मनोरंजक आहेत. काही कमेंट्स इतक्या मजेशीर आहेत की त्या वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही.

अनेकांनी जुईली व रोहितच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ‘अगं जुईली बाळाला अंघोळ तरी घालायची तुझ्या...’,अशी कमेंट एकाने केली आहे. तर ‘अरे आंघोळ करा दोघंपण,’असा मजेशीर सल्ला दिला आहे. ‘जुईली सारखं खातच असते का रे?’, असा मजेशीर प्रश्न एका चाहत्याने विचारला आहे.

अनेकांनी व्हिडीओचं शिवाय क्यूट कपलचं कौतुकही केलंय.  ‘ छान..चालू आहे..असेच चालूदे ..गोड गात राहा..,’ असं एका चाहत्याने लिहिलं आहे.रोहित व जुईली 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. 

जुईली ही सुद्धा लोकप्रिय गायिका आहे. सोशल मीडियावर सुद्ध तिचा मोठा चाहता वर्ग  आहे. जुईलीचे यूट्यूब चॅनल देखील आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये ती सहभागी झाली होती. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. रोहित तर तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहे. रोहित देखील सोशल मीडियावर सक्रिय असतो.

2009 साली झी मराठीवर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा पहिला सीझन भेटीला आला होता. रोहित राऊत या पहिल्या सीझनचा विजेता ठरला होता. त्यानंतर त्याने गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक म्हणून आली होती. तेव्हा रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मग प्रेमात. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली होती. त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते.

टॅग्स :रोहित राऊतसेलिब्रिटी