Join us  

Video : हे असंय...! जुईलीनं शेअर केला रोहितसोबतचा भन्नाट व्हिडीओ, चाहत्यांनी दिल्या अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 4:51 PM

Rohit Raut Juilee Joglekar Video : रोहित व जुईलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. शिवाय या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सही वाचायला हव्यात.

Rohit Raut Juilee Joglekar Video : गायक रोहित राऊत (Rohit Raut)  आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) हे यावर्षी जानेवारीला लग्नबंधनात अडकले. पुण्यातील  ढेपे वाड्यात थाटामाटात हा लग्नसोहळा संपन्न झाला होता. लग्नानंतर रोहित व जुईली संसारात रमले आहेत. पण सोबत धम्माल व्हिडीओ शेअर करण्याचा ‘सिलसिला’  सुरूच आहे. तूर्तास रोहित व जुईली यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. शिवाय या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सही वाचायला हव्यात. या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे आणि यातल्या काही कमेंट्स वाचून तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.‘हे असंय’, असं म्हणत जुईलीने रोहितचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.  #3yearsoldkid, असा हॅशटॅग तिने दिला आहे. यात रोहित जुईलीच्या खोड्या काढताना दिसतोय.

 अनेकांनी जुईली व रोहितच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ताई जपून राहा ग, या वॉन्टेड डॉन पासून, अशी कमेंट एका युजरने केली आहे. अगं माय, ते डोस्क्यावरचे केस तरी काप म्हणावं, असं एकाने लिहिलं आहे. लागेल ना तिला बावळ्या, अशी कमेंट्ही या व्हिडीओवर पाहायला मिळतेय. अरे विसरलात काय, तुम्ही नवरा बायको आहात, अशी कमेंट करत एका युजरने रोहित व जुईलीची मजा घेतली आहे. रोहित व जुईली 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. 

जुईली ही सुद्धा लोकप्रिय गायिका आहे. सोशल मीडियावर सुद्ध तिचा मोठा चाहता वर्ग  आहे. जुईलीचे यूट्यूब चॅनल देखील आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये ती सहभागी झाली होती. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. रोहित तर तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहे. रोहित देखील सोशल मीडियावर सक्रिय असतो.

2009 साली झी मराठीवर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा पहिला सीझन भेटीला आला होता. रोहित राऊत या पहिल्या सीझनचा विजेता ठरला होता. त्यानंतर त्याने गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक म्हणून आली होती. तेव्हा रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मग प्रेमात. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली होती. त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते.

टॅग्स :रोहित राऊतसेलिब्रिटी