Join us  

Sameer Vidwans : रस्त्यांवर खड्डे असण्याला ‘परंपरा’ मानलं पाहीजे... दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं उपरोधिक ट्वीट  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 1:01 PM

Sameer Vidwans tweet : दरवर्षी हे खड्डे बुजवल्याचा दावा केला जातो. पण चित्र मात्र तसंच दिसतं. प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी या समस्येकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे.

पावसाळ्यातील समस्या दरवर्षीच्याच. ठिकठिकाणी तुंबलेलं पाणी, त्यात रस्त्यांची दुर्दशा, हे दरवर्षी पावसाळ्यात दिसणारं दृश्य. रस्त्यांवरच्या खड्डयांची समस्या सर्वाधिक भीषण. अनेक शहरातील नागरिक हा त्रास सहन करत आहेत. मुंबईतील रस्त्यांवरचे खड्डे हा तर महाभीषण प्रश्न. पावसाळ्यात तर हा त्रास आणखीच वाढतो. दरवर्षी हे खड्डे बुजवल्याचा दावा केला जातो. पण चित्र मात्र तसंच दिसतं. प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी या समस्येकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे.मुंबईतील खड्ड्यांच्या समस्येवरचं त्यांचं ट्वीट सध्या चांगलंच व्हायरल होतंय.   

समीर विद्वांस यांचं ट्वीट

 मुंबईत रस्त्यावर भयानक खड्डे झालेत. अर्थात हे काही नवीन नाही. रोजच्या परवचासारखं प्रत्येक जण एकदा तरी हे म्हणतोच. वषार्नुवर्षे.. रस्त्यावर खड्डे असणे ह्याला आता ‘परंपरा’ मानलं पाहीजे, म्हणजे मग ती अभिमानानी जपता येईल! आणि त्यात पाठ, मान, मणका, गाडीची वाट लागणे हे आपलं योगदान ठरेल!, अशा आशयाचं उपरोधिक ट्वीट समीर यांनी केलं आहे.

  समीर विद्वांस यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही.  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जातात.  वैशिष्ट्यपूर्ण विषयांवरचे सिनेमे दिग्दर्शित करून समीर यांनी स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचे डबल सीट, टाइम प्लीज, आनंदी गोपाळ यांसारखे सिनेमे विशेष गाजले. मराठीमध्ये आपल्या नावाचं नाणं खणखणीत वाजवल्यानंतर समीर यांनी आपला मोर्चा आजा बॉलिवूडकडे वळवला आहे. 

टॅग्स :समीर विध्वंसमुंबई