Join us  

मराठमोळ्या या अभिनेत्रीचा भाऊ आसाम-मिझोराम सीमेवरील हल्ल्यात झाला जखमी, प्रार्थना करणाऱ्यांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 12:38 PM

आसाम-मिझोराम सीमेवर गोळी आणि दगडफेकीत अनेक जवान शहिद झाले तर काही गंभीर जखमी देखील आहेत.

आसाम-मिझोराम सीमेवर गोळी आणि दगडफेकीत अनेक जवान शहिद झाले तर काही गंभीर जखमी देखील आहेत. त्यात जखमी झालेले महाराष्ट्रीयन आयपीएस जवान वैभव निंबाळकर यांना मुंबईत आणण्यात आले आहे. आयपीएस जवान वैभव निंबाळकर हे मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचे भाऊ आहेत. आपल्या भावाला गोळी लागले हे ऐकून त्यांच्या पूर्ण कुटुंबाला धक्का बसला होता. नुकतीच उर्मिलाने आपल्या भावासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व भारतवासियांचे आभार मानले आहेत. 

उर्मिला निंबाळकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, सगळे उत्तम चालू असताना सकारात्मक राहणे, प्रार्थना म्हणणे वेगळे आणि ‘वैभवला गोळी लागलीय’ हे वाक्य ऐकायला मिळाल्यानंतर, ‘सगळं नीट होणार’ हा विचार मनात येणं वेगळं! काय झालं, कुठुन झालं, कोणत्या मशिन गननं झालं सगळं दिड दिवसांत एवढ्यावेळा कानावर आलंय पण खरं सांगु, मला आणि माझ्या घरच्यांना फक्त तो सुखरुप असावा, एवढीच आशा लागून राहिली होती. त्यात माझे प्रेग्नन्सीचे ९ महिने पु्र्ण झाल्यामुळे आता कधीही हॅास्पिटल गाठावं लागणार असल्यामुळे, मला ही बातमी सगळ्यात शेवटी सांगण्यात आली. बाळांनाही आपण पॅनिक झालेलो कळतो आणि तेही मग पॅनिक होतात.

ती पुढे म्हणाली की, सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण विश्वासाने आम्ही भरपूर प्रार्थना म्हणालो. यशस्वी शस्त्रक्रिया पार पडून आयपीएस जवान वैभव आता अगदी सुखरुप आहे. किती आणि कुणाकुणाची कृतज्ञता व्यक्त करु? माझा भाऊ वैभवला आसाम-मिझोराम सिमेवर गोळी लागल्यानंतर, त्याची सुखरुप सर्जरी होऊन त्याला आराम लाभेपर्यंत पावलो पावली सद्गुरु रुपात अनेक माणसे मदतीसाठी धावली!

एअर फोर्सच्या स्पेशल एअर ॲम्ब्युलन्सने त्याला मुंबईला आणण्यापासून ते, आसाम पोलिस, आसाम सरकार, मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार, कोकिलाबेन अंबानी हॅास्पिटलचा संपुर्ण स्टाफ, डॅाक्टारांची फौज, आयपीएस वैभवचे सगळे अधिकारी-मित्र-बॅचमेटस्, वरिष्ठ अधिकारी, नामधारक, त्याच्या तब्ब्येतीसाठी प्रार्थना म्हणणारे तुम्ही सर्व..या संपुर्ण प्रक्रियेत माहित असलेले आणि नसलेले कित्तीतरी मदतीचे हात धावून आले. म्हणूनच मी आणि माझं संपुर्ण कुटुंब तुमचे आयुष्यभराचे ऋणी आहोत, असे उर्मिला निंबाळकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.