Join us  

कोणाताही गाजावाजा न करता या मराठी अभिनेत्रीने केले बॉलिवूडमध्ये पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 1:06 PM

20 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आतापर्यंत अनेक मराठी अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, सई ताम्हणकर आणि अमृता खानलविकर यांच्या पावलावर पाऊल टाकत आता आणखी एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. तिचं नाव आहे तेजश्री प्रधान. छोट्या पडद्या असो किंवा रुपेरी पडद्या दोन्ही ठिकाणी तिने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. 

तेजश्रीने आपल्या सिनेमाचे पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. तेजश्रीच्या सिनेमाचे नाव आहे 'बबलू बॅचलर'. यात तिच्यासोबत शर्मन जोशीसुद्धा दिसणार आहे. याआधी शर्मन जोशी आणि तेजश्रीने नाटकात एकत्र काम केले आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर दोघांची केमिस्ट्री एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. 'बबलू बॅचलर' सिनेमा 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

तेजश्रीने होणार सून मी या घरची या मालिकेनंतर चित्रपटात आणि नाटकात काम केलं. त्यामुळे छोट्या पडद्याला काही काळासाठी तिने रामराम ठोकला होता. पण आता ती प्रेक्षकांना 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळतेय.  

टॅग्स :तेजश्री प्रधान