Join us  

"बाबा, वडील म्हणून, मुलगा म्हणून तुम्ही बेस्ट आहातच....", प्रिया बापटने वडिलांसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 5:00 PM

प्रियाने वडिलांसाठी लिहिली भावूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर सेलिब्रेटींसह चाहत्यांनीही कमेंट केलीय.

उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. अलीकडेच प्रियाने बाबांसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

प्रिय आई - बाबा,बाबा, वडील म्हणून, मुलगा म्हणून तुम्ही बेस्ट आहातच आणि कायम असाल. पण, तुमच्या आणि आईच्या ३८ वर्षांच्या संसारात तुम्ही सर्वांत बेस्ट होतात. आर्थिक बाजू तर तुम्ही सांभाळलीच पण सांसारिक सर्व जबाबदार्यांमधे तुमच्या आणि आईच्या पार्टनरशिपला तोड नाही. मुलांचे लाडही दोघांनीही केले आणि आोरडाही दोघांनीही दिला. शाबासकी, कौतुक दोघांनी केलं. अगदी आई घरी नसताना स्वयंपाकाही केलात आणि कधीही अवलंबून न राहण्याची शिकवण दिलीत. आर्थिक अडचण आोढवल्यावर मॅट्रीकही न झालेली आईने घराबाहेर पडून तुमच्या बरोबरीने काम करून आर्थिक जबाबदारी पार पाडली. एरवी नाजूक तब्बेतीची आई तुम्हाला जरा बरं नाहीसं झालं तर सगळं बळ एकवटून झाशीची राणी व्हायची. आणि आईसाठी तुम्ही जे गेली ३ वर्ष केलत, तिची सेवा, प्रेम ते क्वचितच कोणी नवरा आपल्या बायकोसाठी करत असेल. इतकं निस्वार्थ प्रेम. तुम्हा दोघाची मुलं म्हणून श्वेता आणि मी जन्माला आलो, तुमच्या सारख्या आई वडिलांची सेवा करता येणं हेच आमच्या जन्माचं सार्थक आहे. आईची कमतरता कायमच जाणवेल. आज तुमच्या वाढदिवशी Mother’s Day आहे म्हणून दोन्ही शुभेच्छा तुम्हालाच❤️आईकडे आता जादूची कांडी आहे, तुमच्या कडे आशिर्वाद आहेत. ते दोन्ही आमच्या पाठीशी असू देत. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो.  या पोस्टसोबत प्रियाने दोन फोटोदेखील पोस्ट केलंत. सेलिब्रेटींसह चाहते ही पोस्टवर कमेंट करतायेत. 

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती.

 

टॅग्स :प्रिया बापट