Join us  

"पती आणि पत्नी एकतर एकमेकांची ताकद असू शकतात किंवा...", मानसी नाईकची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 5:44 PM

मानसीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे मानसी नाईक रातोरात स्टार झाली. या गाण्याने तिला प्रसिद्धीझोतात आणलं. अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम डान्सर असणारी मानसी तिच्या नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करते. बाई वाड्यावर या पासून ते गुलाबी नोट ही मानसी नाईकची गाणी सुपरहिट ठरलेली आहेत. पण, इंडस्ट्रीतील करिअरपेक्षा मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. 

मानसीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत असते. अनेकदा ती तिचे व्हिडिओही शेअर करत असते. आतादेखील मानसीच्या एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. मानसीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती चहा बनवताना दिसत आहे. 

या व्हिडिओला तिने "पती आणि पत्नी एकतर एकमेकांची ताकद असू शकतात किंवा मग कमजोरी", असं कॅप्शन दिलं आहे. पुढे तिने "मी कोणाबद्दल बोलतेय ओळखा आणि कमेंटमध्ये सांगा", असंही म्हटलं आहे. मानसीची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांना ती नक्की कोणाबद्दल बोलतेय असा प्रश्न पडला आहे.  

काही दिवसांपूर्वीच मानसी नाईकचा घटस्फोट झाला. त्यानंतर मानसीने पुन्हा प्रेमात पडल्याची कबुली दिली होती. मानसीने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर केला होता. मानसीच्या बॉयफ्रेंडचं नाव राहुल खिस्मतराव आहे. तो अंतराळ शास्त्रज्ञ आहे. तीदेखील जर्मनीत स्थित होणार असल्याचेही तिने मुलाखतीत सांगितले.

टॅग्स :मानसी नाईकसेलिब्रिटी